चंद्रपूर: पतीला दारूचे व्यसन होते. दारूच्या व्यसनामुळे पती-पत्नीत कडाक्याचे भांडण व्हायचे. नेहमीच्या भांडणाला कंटाळून पत्नीने टोकाचा निर्णय घेत धारदार शस्त्राने पतीचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे ) येथे बुधवार १७ जुलैच्या मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. हत्या झालेल्या पतीचे नाव अमोल मंगल पोडे (३८) रा.नांदगाव ( पोडे ) ता.बल्लारपूर जि. चंद्रपूर असे आहे.

आरोपी पत्नी लक्ष्मी अमोल पोडे ( ३५) हिला चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. बल्लारपूर तालुक्यात नांदगाव ( पोडे ) गाव ५ हजारांवर लोकसंख्येचे आहे. या गावात पती-पत्नीच्या वादातून ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Sarpanch husband caught cheating on his wife with girlfriend wife beats girlfriend video viral mp
आधी ड्रेस खेचला मग बुक्क्यांनी मारलं! सरपंच पतीला गर्लफ्रेंडबरोबर पाहून पत्नीने घातला राडा, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
hotel Photo Viral
बायकोला वैतागलेल्या नवऱ्यांसाठी खास ठिकाण! हॉटेलच्या नावाची पाटी वाचून चक्रावले नेटकरी, पाहा Viral Photo
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं
After the woman fell from the roof, her husband jumped in to save her viral video on social media of husband wife love
VIDEO: प्रेम काहीही करायला लावतं! बायको छतावरून कोसळली म्हणून नवऱ्याने केलं असं काही की…, पाहा नेमकं काय घडलं
Isha Koppikar first reaction on divorce with Timmy Narang
१४ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण काय? पहिल्यांदाच बोलली ‘खल्लास गर्ल’; म्हणाली, “त्याने अत्यंत बेजबाबदारपणे…”
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…

हेही वाचा – गडचिरोली : चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांत ७ पुरुष ५ महिला, मृतांवर दोन राज्यांत २ कोटींहून अधिक बक्षीस

मृत अमोल हा पत्नी लक्ष्मी व दोन मुले देवांश अमोल पोडे ( ११) आणि सारंग अमोल पोडे ( ८ ) सोबत राहत होते. मात्र अमोलला दारू पिण्याचे व्यसन जडले. यामुळे पती पत्नीत नेहमीच वाद होत होता. त्यामुळे पत्नी लक्ष्मी त्रस्त होती. नेहमी प्रमाणे बुधवारी अमोल घरी मद्यधुंद अवस्थेत आल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. सततच्या जाचाला कंटाळून पत्नीने अमोलला संपविण्याच्या कट रचला. दोन्ही मुले व लक्ष्मीची आई झोपी गेल्याची संधी साधून कोंबडी कापण्याच्या सुरीने अमोलचा गळा चिरून त्याची हत्या केली. घटनेची माहिती चंद्रपूर शहर पोलिसांना देण्यात आली. विशेष म्हणजे, पतीच्या निर्घून हत्येची माहिती स्वतः लक्ष्मीने पोलिसांना दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. अमोलचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. या घटनेचा अधिक तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत.

हेही वाचा – अकोला : खळबळजनक! आमदार नितीन देशमुख यांनी तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांना कोंडले

मुलांचे भविष्य संकटात

अमोल व लक्ष्मी पोडे यांच्यापोटी दोन गोंडस मुले आहेत. देवांश पोडे व सारंग पोडे कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घ्यायचे. मात्र अमोलच्या दारूच्या व्यसनामुळे खर्च परवडत नव्हता. त्यामुळे अमोलने ६ दिवसांपूर्वी नांदगाव ( पोडे ) येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत देवांशला ८ व्या, तर सारंगला तिसऱ्या वर्गात प्रवेश दिला. ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी लक्ष्मीने पतीची हत्या केल्याने दोन्ही शालेय मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे. या घटनेने गावकरी व आप्तेष्टांनाही गहिवरून आले आहे.