चंद्रपूर:शहर तथा जिल्ह्यात आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. या पावसाचा जोर इतका होता की आझाद बागेसमोरील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. यामुळे महापालिकेची पोलखोल झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/05/rain-chandrapur.mp4
चंद्रपुरात मुसळधार पाऊस

गेल्या सात दिवसांपासून शहर तथा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्यानंतर आज सोमवारी सकाळी पाऊस झाला. त्यानंतर दुपारी संततधार पाऊस झाला. सायंकाळी पाच वाजताचे सुमारास पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरू असतानाच सर्वत्र जोरदार टपोऱ्या गारा पडल्या. गारपीटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ही गारपीट सर्वत्र होती. या गारपीटचा बोलका व्हिडिओ चित्रित केला आहे. तसेच आझाद बगीचा समोर गुडघ्याभर पाणी साचले होते. या भागातील अनेक दुकानात पावसाचे पाणी शिरले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur unseasonal rain heavy rain and hailstorm in chandrapur rsj 74 zws