चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रातील पेटगाव-खातेरा बीटात कक्ष क्रमांक ३२२ मध्ये बामणी (माल) येथील दीपा दिलीप गेडाम (३५) ही महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवार ४ मे रोजी सकाळी उघडकीस आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “विरोधकांकडे विषय नसल्यामुळे आता कांद्यावर राजकारण,” देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले…

हेही वाचा – अमरावती : प्रेमप्रकरणात अडसर ठरत असलेल्या पतीची निर्घृण हत्या; पत्नीनेच रचला कट

या घटनेची माहिती मिळताच सिंदेवाहीचे ठाणेदार तुषार चव्हाण, वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी झुडपात दीपा हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. यावेळी शिवणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, क्षेत्र सहाय्यक एस .वाय .बुले, क्षेत्र सहाय्यक पेंदोर, वनरक्षक मडावी घटनास्थळी हजर होते. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केल्यानंतर तत्काळ आर्थिक मदत देऊन मृतदेह कुटुंबाकडे सोपविण्यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur woman died in tiger attack incidents in sindevahi taluka rsj 74 ssb