नागपूर : कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते येईल यापेक्षा महाराष्ट्र नंबर एकवर कसा राहील याला आमची प्राथमिकता राहणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांवर त्यांच्या आमदारांचा विश्वास आहे. राज्यातील हे नवसमीकरण महायुतीच आहे, महाविकास आघाडीचे नाही अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रशेखर बावनकुळे प्रसार माध्यमांशी बोलत होते. राजकारणामध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र आले तर विकास करणे सोपे जाते. शेवटी देशहीतासाठी काही निर्णय घ्यावे लागतात.सरकारमधील तीनही प्रमुख नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कार्यक्षम नेते आहेत. घरी बसून काम करणार नाही त्यामुळे कोणते खाते कोणाला मिळते यापेक्षा सरकार मजबुतीने चालवणे जास्त महत्त्वाचे आहे. पालकमंत्री पद कोणाला कोणते द्यावे याचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे.