“शिवसेनेचे नेते संजय राऊत बावचळले आहेत. त्यामुळे सकाळ-दुपार आणि संध्याकाळ ते माध्यमांशी संवाद साधून शिंदे व फडणवीस सरकारवर टीका करीत आहेत. सध्या त्यांना तेवढेच काम असल्यामुळे त्यांच्यावर नागपूर दौरा करण्याची नामुष्की ओढवली.” अशी टीका माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच, “आज ठाकरे सरकार असते आणि गडचिरोलीत पूर आला असता तर त्यांनी फेसबुक लाईव्ह केले असते. पण, शिंदे आणि फडणवीस यांनी स्वतः जाऊन गडचिरोलीत पाहणी केली आणि उपाययोजना करत तेथील लोकांना दिलासा दिला. शिंदे – फडणवीस सरकार पुढील अडीच वर्षात एवढे काम करेल की संजय राऊत असो की महाविकास आघाडी मधील अन्य नेते असो त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही.” असंही बावनकुळेंनी बोलून दाखवलं.

शिंदे आणि फडणवीस सरकार ओबीसीना न्याय देणार –

याचबरोबर, “महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत दोन वर्ष काहीच केले नाही, भुजबळांनी समता परिषदेचे मोर्चे काढले आणि वडेट्टीवार संमेलन घेत राहिले. त्यामुळे ओबीसी आरक्षणावरुन टीका करण्याचा त्यांना अधिकार नाही. शिंदे आणि फडणवीस सरकार ओबीसीना न्याय देणार आहे.” असा दावाही बावनकुळे यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrasekhar bawankule criticized anjay raut msr