नागपूर : कॉंग्रेसने घराणेशाही केली आणि राष्ट्रवादी पक्ष ही सरदारांची फौज आहे. शरद पवार यांनी कुटुंबाशिवाय बाहेरच्या लोकांना मोठे होऊ दिले नाही. भाजपाने देशाला मोठे नेतृत्व दिल्यामुळे आमच्या पक्षात सामान्य कार्यकर्ता मोठा होऊ शकतो. त्यामुळे रोहीत पवार नुकतेच राजकारणात आले आहे, त्यामुळे त्यांनी भाजपावर बोलण्यापूर्वी आपल्या पक्षाची परंपरा आणि संस्कृती बघावी, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बावनकुळे प्रसार माध्यमांशी बोलत होते. धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे, मात्र समाजाच्या समस्या मी पत्र लिहून पाठवलेल्या आहे, कोणीतरी जाणीवपूर्वक राज्यातील वातावरण खराब करण्याचे काम करत आहे. गोपीचंद पडळकर काय म्हणाले माहिती नाही, मात्र व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो. त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिली आहे. महिला अरक्षणामुळे काँग्रेस आता बॅकफूटवर गेले, केंद्र सरकारने ऐतिहासिक महिला आरक्षण दिले आहे, त्यामुळे काँग्रेसचे नेते काहीतरी बोलत गोंधळ निर्माण करतात, मात्र त्यांना महत्त्व देण्याची गरज नसल्याचे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा – भारतात गोसेवा व गोरक्षण समजून सांगावे लागत आहे, हेच वेदनादायी; संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची खंत

हेही वाचा – ऋषिपंचमीनिमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; साडेचारशे दिंड्या दाखल

काँग्रेसच्या काळात महिला आरक्षणाचा कायदा १२ वेळा वापस पाठवला. राज्यसभेत मंजूर झाल्यावर वापस पाठवणाऱ्या काँग्रेसला महिला आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही, काँग्रेस तर महिला आरक्षणविरोधी असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrasekhar bawankule criticized the ncp and rohit pawar as well as the congress vmb 67 ssb
Show comments