नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी हे चांगले वक्ते नाही, असे काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. ते खरे बोलले आहेत, जर वडेट्टीवार यांना अशी शंका असेल तर त्यांच्या मनात काय सुरू आहे, याचा अर्थ काढावा, असा चिमटा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला.चंद्रशेखर बावनकुळे नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. वडेट्टीवार यांची जर ही भूमिका असेल तर २८ पक्षांच्या इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी राहुल गांधी यांना नेतृत्त्व द्यावे किंवा नाही, याचा विचार करावा, असे बावनकुळे म्हणाले.एकनाथ शिंदे आणि अजित पवार देशहिताच्या विचाराने भाजपा सोबत आले. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यातच भारताचे कल्याण आहे, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादीतील वाद

राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादावार बोलताना बावनकुळे म्हणाले, निवडणुकीत लोकांमधून विजयी झालेले आमदार-खासदार ज्यांच्याबाजूने असेल त्यांचा खरा पक्ष, असे माझे मत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यायाचा आहे.