बुलढाणा: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे २ सप्टेंबर रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या दौ-यावर असून ते लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा मतदारसंघांत ‘संपर्क से समर्थन’ अभियानात सहभागी होणार आहेत.बावनकुळे यांच्यासोबत लोकसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहे. शनिवारी सकाळी १० वाजता चिखली विधानसभा क्षेत्रातून दौऱ्याचा प्रारंभ होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चिखली येथील महाराणा प्रताप पुतळा ते चव्हाण बीज भंडारपर्यंत आणि सायंकाळी ४ वाजता खामगाव येथील अर्जून जल मंदिर ते भगतसिंग चौकापर्यंत अभियानात ते सहभागी होतील. दुपारी साडेबारा वाजता मौनी बाबा संस्थान, चिखली येथे बुलढाणा, सिंदखेडराजा व चिखली तर सायंकाळी साडेपाच वाजता खामगावच्या कोल्हटकर स्मारक मंदिर येथे जळगाव-जामोद, मेहकर व खामगाव विधानसभा क्षेत्रातील प्रमुख भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. यासोबतच ते चिखली व खामगाव येथील प्रतिष्ठीत व्यक्तींच्या भेटी घेणार आहेत.