महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला भाजपचा नाही ,तर स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. विरोधकांनी आमच्या नेत्याबद्दल वैयक्तिक टीका केल्यास आम्हालाही जशास तसे उत्तर द्यावे लागेल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. सभेला विरोध हा स्थानिक लोकांचा आहे. भाजपचा विरोध नाही. मात्र गेल्या काही सभेत आमच्या पक्षातील नेत्यांवर वैयक्तिक पातळीवर टीका व आरोप केले जात असेल तर त्याला आम्ही जशास तसे उत्तर देऊ.

एकनाथ शिंदे यांना मी कधी रडताना पाहिलेले नाही. यामुळे मातोश्रीवर काय झाले याबद्दल मला माहित नाही मात्र आदित्य ठाकरे काही बोलू शकतात त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे आम्ही गंभीरपणे बघत नाही, अशी उपरोधीक टीका त्यांनी केली. रश्मी ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून राजकारणात येण्याची चिन्हे आहे असे विचारले असता बावनकुळे म्हणाले, अखेरीस त्या ठाकरे कुटुंबातील आहेत. कुटुंबातील व्यक्तीलाच ते राजकारणात आणत असतात. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा समाजवादी पक्ष किंवा देशातील इतर पक्ष प्रत्येक ठिकाणी परिवार वाद आहे. केवळ भाजपच असा पक्ष आहे जिथे परिवार नसून कार्यकर्ता उच्च पदावर जाऊ शकतो असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा >>>अकोला: ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, जाणून घ्या कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाशीम मध्ये काँग्रेसचे पंचवीस हजार कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी त्या सभेला उपस्थित राहणार आहे. येणाऱ्या काही दिवसात आम्ही राज्यातील प्रत्येक बुथवर किमान २५ नवीन कार्यकर्ते पक्षाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील एक लाख बूथ वर हे कार्यक्रम घेतले जाणार असून २५ लाख नवे कार्यकर्ते येणाऱ्या काही दिवसात भाजप सोबत जोडले जाणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.