नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत असलेले सगळे वेगवेगळ्या पक्षात गेले आहेत. त्यांच्यासोबत कोणी राहिले नाही. त्यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. सध्या नाना पटोले हे शोले चित्रपटातील असरानीच्या भूमिकेत आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बावनकुळे नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नाना पटोले यांना सध्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये बाजूला करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत असलेले नेते इकडेतिकडे गेले आहे. यामुळे ते शोले चित्रपटातील असरानीच्या भूमिकेत काम करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे राज्यातील लाडकी बहीण योजनेवर, शेतकऱ्यांच्या वीज बील माफ केल्यावर टीका करत आहेत. काँग्रेसचे राज्य असलेल्या ठिकाणी सुरू केलेल्या योजना बंद केल्या जात आहे. राज्यातील प्रत्येक योजनेवर ते टीका करत असताना आता महाराष्ट्राची जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीला राज्यात कुठेही समर्थन नाही. त्यांच्याजवळ जाहीर सभामधून काहीही सांगण्यासारखे नाही, त्यामुळे केवळ भाजप आणि महायुतीच्या नेत्यांवर टीका करणे हा एकमेव कार्यक्रम त्यांचा आहे. फेक नेरेटीव्ह पसरवत लोकसभेत प्रचार केला मात्र आता विधानसभा निवडणुकीत जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा महराष्ट्रात होत आहे. राज्यात जनतेच्या विकासासाठी महायुतीचे सरकार यावे. डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करावा आणि महाराष्ट्र देशात एक क्रमांकाचा राज्य व्हावे यांसाठी ते जनतेला संबोधित करत आहेत. अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, असे संकेत दिले असले तरी राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री होईल. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे भाजपचा विजय हा खऱ्या अर्थाने नेतृत्वाचा विजय असतो, आमच्या जास्तीत जास्त जागा महायुती म्हणून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या याव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. महायुतीचे सरकार असे अमित शाह म्हणाले त्यामुळे त्यांचे वक्तव्य वेगळ्या पद्धतीने घेऊ नये, असेही बावनकुळे म्हणाले. महायुतीचे सरकार हे मुख्यमंत्री बनवण्याच्या कुठल्याही चढाओढीमध्ये नाही. आम्ही विकासासाठी काम करतो आहे, मुख्यमंत्री पदासंदर्भात केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल, असेही बावनकुळे म्हणाले.

हे ही वाचा… नक्षलवादी संविधानाला मानत नाही; भाजपलाही संविधान संपवायचे आहे – छत्तीसगड माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल

राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकाबाबत छगन भुजबळ यांच्यासोबत चर्चा केली. मी असे कुठेही बोललो नाही, असे त्यांनी मला सांगितले. त्यांनी पुस्तकात लिहिलेले सर्व काही खोटे आहे, मी कुठेही असे बोललो नसल्याचे त्यांनी मला सांगितले. याबाबत भुजबळ हे कायदेशीर कारवाई करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule comment on nana patole he currently in the role of asrani of sholay film vmb 67 asj