नागपूर : दिवंगत बाळासाहेब ठाकरे आपल्या शिवसैनिकांसोबत पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. थोडं आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. आधुनिक युगातील एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन ठाकरेंची शिवसेना आपल्या नाशिकच्या मेळाव्यात हा प्रयोग केला . तेव्हा पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेला ठाकरे शैलीतील भाषण बाळासाहेब ठाकरे यांच्या एआय निर्मित आवाजात ऐकण्याची उत्सुकता शिवसैनिकांना होती. महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बाळासाहेब भाष्य करणार याकडे लक्ष होते.. यावर भाजपचे प्रदेशा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रखर टीका केली आहे.

बावनकुळे म्हणाले, आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उबाठासारखा गटच करू शकतो. मला खात्री आहे, आज ज्यांनी… बाळासाहेबांना जनाब ठरविले,ज्यांनी टिपू सुलतानाचे नावं उद्यानांना दिली.

बावनकुळेंच्या टिकेतील मुद्दे

वीर सावरकरांचा सकाळी अपमान करणार्‍या राहुल गांधींच्या गळ्यात सायंकाळी गळे घातले…

वक्फच्या विरोधात मतदान केले

राममंदिराला सातत्याने विरोध करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसले

३७० रद्द करणार्‍याला विरोध करणार्‍यांना पाठिंबा दिला

वाझेसारख्यांकडून वसुली करवून घेतली

डेडबॉगी बॅगमध्येही घोटाळे केले

कोविड काळात खिचडीत घोटाळे केले

मराठी माणसांच्या घरात घोटाळे करुन गल्ले भरले

त्यांच्या बुडावर बाळासाहेबांनी लाथच घातली असती….ज्या गोष्टींसाठी बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, किमान त्याच्या विरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरु नये. त्यांचे विचार बुडविलात. किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर करू नका. आज बाळासाहेब असते तर लाथच मारली असती अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात केला आहे. बाळासाहेबांचा आवाज वापरून त्यांच्या विचारांचा द्रोह करण्याचा हा प्रकार आहे. बाळासाहेबांचे संपूर्ण आयुष्य ज्याच्या विरोधात गेले, त्याच विचारांच्या बाजूने उबाठा गट आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून म्हणाले.