लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : पालकमंत्री नियुक्तीचा कोणताही पेच नाही. महायुतीचे सरकार असल्याने घटक पक्षांना विचारात घेऊन निर्णय घ्यावा लागतो. येत्या २६ जानेवारीपूर्वी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्याचे नाव जाहीर झालेले असेल, असा विश्वास महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त म्हणाले. यापूर्वी बावनकुळे यांनी १५ किंवा १६ जानेवारीपर्यंत पालकमंत्री पदाचा विषय सुटलेला असेल, असा दावा केला होता. हे येथे उल्लेखनीय.

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झाला. त्यानंतर संपूर्ण हिवाळी अधिवेशनात विनाखात्याचे मंत्री होते. हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले. आता जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. पालकमंत्री ठरवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांच्याकडे दिली होती. घटक पक्षांशी चर्चा करून पालकमंत्री ठरवावे, असे फडणवीस यांनी सांगितले होते. त्यालाही तीन आठवडे झाले. मात्र अद्याप नागपूरसह एकाही जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला नाही. यावरून या मुद्यावरून महायुतीत वाद आहे असे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बावनकुळे यांना पालकमंत्रीपदाबाबत विचारले असता ते म्हणाले, फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. २६ जानेवारीपूर्वी सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर केले जातील. पालकमंत्री नियुक्तीचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. ते त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतील.

आणखी वाचा-जागावाढीच्या मागणीवरून ‘एमपीएससी’च्या दोन गटांमध्ये संघर्ष का सुरू आहे? ही आहेत कारणे

बावनकुळे गेल्या सोमवारी १५ किंवा १६ तारखेपर्यंत पालकमंत्री पदाचा विषय सुटलेला असेल. मुख्यमंत्री अजित दादा एकनाथ शिंदे आणि आमच्या दोन-तीन बैठकी झाल्या आहे. पालकमंत्री पदाचे वाटप अंतिम टप्प्यात आहे, असे सांगितले होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जानेवारी अखेर येणे अपेक्षित आहे. त्यानंतर राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद निवडणुका होऊ शकतील. दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची विनंती राज्य सरकारतर्फे केली जाईल, असेही बावनकुळे म्हणाले.

आणखी वाचा-चंद्रपूर : मुनगंटीवार आणि जोरगेवारांमध्ये कुरघोडीची स्पर्धा!

बावनकुळे यांनी आज नागपूर जिल्हा परिषदेचा आढावा घेतला. नागपूर जिल्हा परिषदेची मुदत उद्या, शनिवारी संपत आहे. येथे प्रशासक नियुक्ती पूर्वी बावनकुळे यांनी आढावा बैठक घेतली. मार्चमध्ये राज्याच अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्याकरिता जिल्हा परिषदेतील आढावा घेण्यात आला. काही कामे प्रस्तावित केले जातील. प्रस्तावित कामांचा अर्थसंकल्पात समावेश असतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule gives new date for appointment of guardian minister rbt 74 mrj