नागपूर : सत्यजित तांबे यांनी पाठिंब्यासाठी संपर्क साधलेला नाही. मात्र त्यांनी इच्छा व्यक्त केली तर नक्कीच केंद्रीय संसदीय मंडळाकडे प्रस्ताव पाठवून परवानगी घेतली जाईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातून चांगले युवा नेतृत्व आमच्याकडे येणार असतील, तर आम्ही का नाही घ्यायचे. आम्ही काही संन्याशी नाही असे सूचक वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> उमेदवारी अर्जाच्या गोंधळाची राज्यात जुनीच परंपरा

चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी सकाळी नागपुरात प्रसार माध्यमाशी बोलत होते. सुधीर तांबे यांनी काँग्रेसचा एबी फॉर्म नाकारण्याशी आमचा कुठलीही संबंध नाही. नाशिकमध्ये आम्हीही अपूर्णच होतो. निवडणूक जिंकू शकू अशी स्थिती आमची नव्हती. आमचे जे कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात आहे त्यांच्या जिंकण्या संदर्भात चाचपणी करतो आहे. असेही बावनकुळे म्हणाले. विरोधी पक्षाला आपले घर सांभाळता येत नसेल, तर आम्ही जबाबदार नाही. राज्यसभेची निवडणूक, विधान परिषदेची निवडणूक आणि त्यानंतर पन्नास आमदार निघून गेले. आता जे राहिलेले आहे, त्यांनाही या नेत्यांना सांभाळता येत नाही.

हेही वाचा >>> “सत्यजित तांबेंना संधी द्या, नाहीतर…”, बाळासाहेब थोरातांसमोर देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी

 विधानसभेत जर आम्हाला बहुमत सिद्ध करायची वेळ आली तर आमची १६४ पासून १८४ झाले तर आश्चर्य मानू नका. काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरे गटाकडे युवा नेतृत्व असेल आणि ते आमच्याकडे यायला तयार असेल. तर आम्ही त्यांना का नाही म्हणायचे. आम्ही काही संन्याशी नाही. याला इन्कमिंग म्हणू नका, ही त्यांच्या पक्षातील समस्या आहे. ७५ -८० वय होऊनही त्यांचे नेते नेतृत्व सोडत नाही. बाजूला हटत नाही अशी टीका बावनकुळे यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule suggestive statement about supporting satyajit tambe nagpur vmb 67 ysh