वर्धा : चंद्रयानचे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले. यातील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर सुमारे अडीच तासात सहा चाके असलेला प्रज्ञान रोव्हर लँडरमधून बाहेर पडला. विक्रम व प्रज्ञान हे दोन्ही पुढील १४ दिवस सौर ऊर्जेवर चालणार आहेत. पृथ्वीवरील चौदा दिवस म्हणजे चंद्रावरील एक दिवस असतो. त्यानंतर चंद्रावर अंधार असतो. म्हणून विक्रम व प्रज्ञान काम करू शकणार नाही.
हेही वाचा >>> नागपूर : भाजप नेत्या सना खान हत्याकांड प्रकरणात मध्यप्रदेशातील आमदार संजय शर्मा यांची चौकशी
अंधार पडल्यावरही ही दोन्ही उपकरणे कार्यारत राहू शकतील, असा शास्त्रज्ञांना आशावाद आहे. या चौदा दिवसाच्या मोहिमेत चंद्रावर भविष्यात मानवी वस्ती वसविली जावू शकते का, चंद्रावर पाणी आहे का, याचे संशोधन होणार असल्याचे इस्रो कडून सांगितल्या गेले. लँडरमध्ये ‘ रेडिओ ऐनॉटॉमी ऑफ मून बाऊनड हायपर सेन्सिटिव्ह आयनोस्फियार अँड अँटमॉसफीअर ‘ ( RAMBHA ) हे पेलोड लावले आहे. हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा घनतेची तपासणी करेल.हे महत्वाचे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील गुणधर्माचा अभ्यास करणार.