वर्धा : यूजीसी अर्थात युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन या विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत देशभरातील केंद्रीय विद्यापीठ तसेच राज्य व खासगी विद्यापीठ यांची नियमावली तयार केली जात असते. अलीकडे या आयोगाने यूजीसी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट २०२५ या परीक्षेत मोठा बदल जाहीर केला आहे.

हा बदल विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा असे म्हटल्या जाते. पण नॅशनल टेस्टिंग एजेंसीने या बदलची दखल घेत काही नव्या अटी लागू केल्यात. त्यामुळे विषय निवडताना विद्यार्थीवर्गांत गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जर एखाद्या विद्यार्थ्याने बारावीत गणित या विषयाचा अभ्यास केला नसेल तरीही तो गणितासह विद्यापीठ चाचणी परीक्षा देवू शकतो. तसेच संबंधित यूजी अभ्यासक्रमात प्रवेशदेखील घेऊ शकतो, असा हा बदल आहे. प्राप्त माहितीनुसार, नॅशनल टेस्टिंग एजेन्सीने या परीक्षेत विद्यापीठ अनुदान आयोगाचे बदल लागू केलेत. पण विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठाच्या प्रवेश नियमांचे पालन करावे लागेल, अशी अट घातली. त्यामुळे आता या स्थितीत विद्यार्थ्यांना विषय संयोजन करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. ही स्थिती विद्यार्थी वर्गास गोंधळात टाकणारी ठरत आहे.

तर टेस्टिंग एजेन्सीने अद्याप या परीक्षेसाठी एफएक्यू म्हणजेच फ्रेकवेटली आस्कड क्वेशन अर्थात नियमित विचारले जाणारे प्रश्न प्रसिद्ध केले नाही. ही बाब विद्यार्थ्यांसाठी अडचणीत भर टाकणारी ठरली आहे. परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास माहित असणाऱ्या आवश्यक सर्व प्रश्नांची उत्तरे एफएक्यूमध्ये असतात. गेल्यावर्षी राष्ट्रीय परीक्षा संस्थेने एकूण १२७ प्रश्नासाठी एफएक्यू  प्रसिद्ध केले होते. या परीक्षेत यशस्वी होणारे विद्यार्थी विविध केंद्रीय व राज्य विद्यापीठे तसेच देशभरातील असंख्य खाजगी विद्यापीठात पदवीपूर्व अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास पात्र ठरतात. या सत्रात देशातील ३०२ विद्यापीठे या परीक्षेत सहभागी होत आहेत.

कॉमन युनिव्हर्सिटि एंट्रन्स टेस्ट या परीक्षेची नोंदणी सुरू झाली आणि हा गोंधळ पुढे आला. अर्ज करण्यची शेवटची तारीख २२ मार्च २०२५ अशी निश्चित झाली आहे. ही परीक्षा देशभरात नियुक्त विविध केंद्रावर घेतल्या जाणार. सर्व ती तयारी परीक्षेसाठी झाली असतांनाच लागू झालेल्या अटी पेचात टाकणाऱ्या ठरल्या, असे म्हटल्या जात आहे. अटी पालन न झाल्यास वेळेवर काय करणार, असा परीक्षेस सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे.

Story img Loader