नागपूर: करोनानंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने मागील आठवड्यात सोन्याच्या दरात सतत घट होत असल्याचे चित्र होते. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असतांनाच सोमवारी (१४ एप्रिल २०२५ रोजी) सोन्याच्या दरात पुन्हा बदल बघायला मिळाले. तर चांदीच्याही दरातही बदल झाल्याने ११ एप्रिलच्या तुलेत १४ एप्रिल २०२५ रोजी चांदीच्या दरात २ हजार ४०० रुपयांचा फरक नोंदवला गेला.

हल्ली लग्नसराईचे दिवस असल्याने सराफा व्यवसायिकांकडे ग्राहकांची गर्दी दिसत आहे. त्यातच नागपुरात पंधरा दिवसांपूर्वी सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहचले होते. परंतु मागच्या आठवड्यात या दरात घसरण झाली. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात शुक्रवारी (११ एप्रिल २०२५ रोजी) सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९३ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८७ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६१ हजार रुपये होते.

दरम्यान सोन्याचे दर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आंबेडकर जयंतीच्या जवशी सोमवारी (१४ एप्रिल २०२५ रोजी) दुपारी १२.३० वाजता २४ कॅरेटसाठी प्रति १० ग्राम ९४ हजार०००० रुपये, २२ कॅरेटसाठी ८७ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६१ हजार १०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे ११ एप्रिलच्या तुलनेत १४ एप्रिल २०२५ रोजी नागपुरात सोन्याचे दर जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम २०० रुपये, २२ कॅरेटसाठी २०० रुपये, १८ कॅरेटसाठी १०० रुपये, १४ कॅरेटसाठी १०० रुपये वाढल्याचे दिसत आहे.

करोनानंतर दरात सातत्याने वाढ

करोनानंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. मध्यंतरी केंद्र सरकारने कर कमी केल्याने दरात घसरण झाली होती. परंतु त्यानंतर पून्हा सातत्याने सोन्याचे दर वाढतांना दिसत आहे.

चांदीच्या दरातही वाढ

नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर शुक्रवारी सकाळी १० वाजता (११ एप्रिल २०२५ रोजी) चांदीचे दर प्रति किलो ९३ हजार १०० रुपये होते. हे दर तीन दिवसांनी सोमवारी (१४ एप्रिल २०२४ रोजी) दुपारी १२.३० वाजता प्रति किलो ९३ हजार १०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरातील बाजारात चांदीचे दर प्रति किलो २ हजार ४०० रुपयांनी वाढलेले दिसत आहे.