नागपूर: सोने- चांदीचे दर स्थिर होण्याचे नाव घेत नाही. मध्यंतरी सोने- चांदीचे दर विक्रमी उंचीवर गेले होते. त्यानंतर दरात मोठी घसरण झाली. परंतु आता पून्हा सोने- चांदीच्या दरात सातत्याने मोठे बदल बघायला मिळत असल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. सोने- चांदीच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या. करोना काळात सोने- चांदीचे दर घसरले होते. परंतु त्यानंतर सातत्यान नागपूरसह देशभरात सोने- चांदीचे दर वाढतांनाचे चित्र आहे. दरम्यान आठवड्याच्या पहिल्या दिवशी ३ मार्च २०२५ रोजी नागपुरात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. परंतु आता पून्हा सोन्याचे दर वाढतांना दिसत आहे. नागपुरातील सराफा बाजारात ३ मार्च फेब्रुवारी २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ८५ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७९ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६६ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५५ हजार ४०० रुपये नोंदवले गेले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा