नागपूर: सोन्याच्या दरात बदल होण्याचा क्रम थांबण्याचे नाव घेत नाही. ‘व्हेलेंटाईन डे’ला नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. परंतु दुसऱ्या दिवशी त्यात घट झाली. शनिवारी (१५ फेब्रुवारी २०२५) सोन्याच्या दरात किंचित घट झाली., परंतु सोमवारी (१७ फेब्रवारी २०२५) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर पुन्हा बदलले. सोमवारच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या.

केंद्र सरकारने मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमाशुल्कात ६ टक्केपर्यंत कमी केल्यावर सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पानंतर मात्र सोन्याचे दर सातत्याने वाढत आहे. सोन्याचे दर वाढत असल्याने ग्राहकांमध्ये चिंता आहे. नुकत्याच झालेल्या व्हेलेंटाईन डेलाही सोन्याचे दर उच्चांकीवर असल्याने प्रेमी युगलासह आपल्या पत्नीला विविध दागिने भेट देण्यासाठी ग्राहकांचा हिरमोड झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर किंचित घसरले होते.

दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात व्हेलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ८५ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७९ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६६ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५५ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. हे दर दोन दिवसानंतर १७ फेब्रुवारी २०२५ रोजी नागपुरातील सराफा बाजारात प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ८५ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७९ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६६ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५५ हजार ६०० रुपये नोंदवण्यात आले. त्यामुळे नागपुरातील सराफा बाजारात दोन दिवसानंतर सोन्याचे दर १७ फेब्रुवारी २०२५ रोजी १५ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या तुलनेत २४ कॅरेट सोन्यामध्ये प्रति दहा ग्राम ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ३०० रुपयांनी वाढलेले दिसत आहे. सोन्याचे दर पून्हा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.

चांदीच्या दरामध्ये…

नागपुरातील सराफा बाजारात व्हेलेंटाईन डेच्या दिवशी शनिवारी (१४ फेब्रुवारी २०२५ रोजी) चांदीचे दर ९८ हजार ५०० रुपये प्रति किलो होते. हे दर दुसऱ्या दिवशी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी सराफा बाजार उघडल्यावर ९६ हजार ५०० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले. दरम्यान १७ फेब्रुवारी २०२५ रोजी नागपुरातील सराफा बाजारात चांदीचे दर प्रति किलो ९६ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे १५ फेब्रुवारीच्या तुलनेत १७ फेब्रुवारीला दरात बदल नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.