नागपूर: हल्ली लग्नसराईचे दिवस असल्याने नागपूरसह राज्यभरातील सराफा दुकानात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. त्यातच सोन्याचे दर आताही नियंत्रणात येण्याचे नाव घेत नाही. दरम्यान शुक्रवारी (२७ डिसेंबर)ला नागपुरात सोन्याच्या दरात मोठे बदल बघायला मिळाले. त्यामुळे दागिने खरेदीचा बेत असलेल्या ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपुरात मंगळवारी (२४ डिसेंबर २०२४) रोजी सराफा बाजार उघडल्यावर सोन्याच्या दरात वाढ नोंदवली गेली. हे दर मंगळवारी (२४ डिसेंबर २०२४) रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७६ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ६०० रुपये नोंदवले गेले होते. हे दर तीन दिवसानंतर चांगलेच वाढत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा >>>‘एमपीएससी’: ‘या’ उमेदवारांना सुवर्ण संधी; तेवीस परीक्षा…

नागपुरातील सराफा बाजारात शुक्रवारी (२७ डिसेंबर २०२४) रोजी दुपारी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७७ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार १०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात २४ डिसेंबरच्या तुलनेत २७डिसेंबरला सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. ही वाढ २४ कॅरेटमध्ये ७०० रुपये, २२ कॅरेटमध्ये ६०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ६०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ५०० रुपये प्रति दहा ग्राम इतकी आहे. या दरामध्ये

येत्या काळात आणखी वाढ होण्याचे संकेत सराफा व्यवसायिकांकडून दिले जात आहे. त्यामुळे सोने खरेदीतील गुंतवणूक आताच्या काळात लाभदायक असल्याचा सराफा व्यवसायिकांचा दावा आहे.

हेही वाचा >>>अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…

चांदीच्या दरामध्ये घसरण…

नागपुरातील सराफा बाजारात २४ डिसेंबरला सकाळी बाजार उघडल्यावर १०.३० वाजता चांदीचे दर ८८ हजार ७०० रुपये प्रति किलो होते. हे दर २७ डिसेंबरला दुपारी ८९ हजार ५०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले. त्यामुळे २४ डिसेंबरच्या तुलनेत नागपुरात २७ डिसेंबरला चांदीच्या दरात तब्बल ८०० रुपये प्रति किलो वाढ नोंदवली गेली आहे.

लग्नाच्या हंगामामुळे ग्राहक वाढले

हल्ली लग्नाचा हंगाम सुरू आहे. लग्नामध्ये वर- वधूला मोठ्या प्रमाणात सोन्याची साखळी, मंगळसूत्रासह इतरही दागिने भेट देणे अथवा स्वत:साठी बनवून घेतले जातात. त्यामुळे हल्ली सराफा दुकानात ग्राहकांची गर्दी दिसत आहे. सोबत वाढदिवसासह इतरही अनेक कार्यक्रमांमध्ये सोने- चांदीचे दागिने भेट दिले जातात.