अमरावती : अनुसूचित जमातीचा दर्जा देण्‍याच्‍या मागणीसाठी झारखंडमध्‍ये कुर्मी समाज संघटनांनी बुधवारी २० सप्‍टेंबर रोजी ‘रेल्‍वे रोको’ आंदोलन करण्‍याचा निर्णय घेतल्‍याने मध्‍य रेल्‍वेच्‍या वाहतुकीवर परिणाम झाला असून काही एक्‍स्‍प्रेस गाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत, तर काही गाड्यांच्‍या वाहतुकीत बदल करण्‍यात आला आहे. १९ सप्‍टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणारी १२८०९ सीएसएमटी – हावडा मेल  ही भुसावळपर्यंतच धावणार आहे. भुसावळ ते हावडा पर्यंत ही गाडी रद्द करण्‍यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१८०२९ लोकमान्‍य टिळक टर्मिनस- शालीमार एक्‍स्‍प्रेस (१९ सप्‍टेंबर) बडनेरा पर्यंतच धावणार आहे. बडनेरा ते शालीमार पर्यंत ही गाडी रद्द करण्‍यात आली आहे. १२२६१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा दुरांतो एक्‍स्‍प्रेस या गाडीच्‍या वेळेत आणि वाहतुकीत बदल करण्‍यात आला आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ००.३० वाजता (२० सप्‍टेंबर) सुटेल आणि नागपूरपर्यंतच धावणार आहे. ही गाडी नागपूर ते हावडा पर्यंत रद्द करण्‍यात आली आहे. आंदोलनाच्‍या पार्श्‍वभूमीवर अनेक रेल्‍वेगाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in railway transport in the background of kurmi community agitation mma 73 ysh