लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: कडबी चौक ते मोतीबाग रेल्वे क्रॉसिंग, मोतीबाग रेल्वे क्रॉसिंग, गार्ड लाईन ते गोळीबार चौक येथे रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. तसेच जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक अन्य मार्गाने वळती करण्यात आली आहे.

कडबी चौक ते मोतीबाग रेल्वे क्रॉसिंग रेल्वे ओव्हर ब्रिज बांधकाम दरम्यान दुचाकी वाहने बेझनबाग चौक येथून बेलीशॉप कॉर्टर या मार्गाचा वापर करतील. इतर लहान चारचाकी वाहने ही कडबी चौक, मंगळवारी बाजार, मेश्राम पुतळा किंवा मंगळवारी बाजार चौक डावे वळण घेवून गड्डी गोदाम रोड, पुढे आवश्यतेनूसर जाईल. गोळीबार चौकाकडील वाहतूक मेयो हॉस्पिटल, रामझुला, एलआयसी चौक, पुढे आवश्कतेनूसार कडबी चौक अशी जाईल.

आणखी वाचा-कुनो राष्ट्रीय उद्यानात दुसऱ्यांदा पाळणा हलला; चित्ता ‘आशा’ ने दिला तीन बछड्यांना जन्म

संत्रा मार्केटकडून येणारी गार्ड लाईनकडे येणारी संपूर्ण वाहतूक बंद करण्यात येत असून फक्त दुचाकी वाहने ही रामझुल्याच्या खालून वळण घेऊन दोसर भवन चौक, भगवाघर चौक, मोमीनपूरा येथून डावे वळण घेऊन पुढे कडबी चौकाकडे जाईल. इतर चारचाकी वाहने ही रामझुला येथून युटर्न घेऊन एलआयसी चौक, पुढे आवश्यकतेनुसार कडबी चौक अशी जाईल.

कडबी चौकाकडून गोळीबार चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची चारचाकी वाहने १० क्रमांकाच्या पुलावरुन कमाल चौक मार्गे पुढे आवश्यकतेनुसार जातील. गोळीबार चौकाकडून कडबी चौकाकडे जाणारी संपूर्ण चारचाकी वाहने ही कमाल चौकातून डावे वळण घेऊन आवळे बाबु चौकाकडून वळण घेत दहा नंबर पुलावरुन डावे वळण घेवून बेझनबाग मार्गे कडबी चौकाकडे जाईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in traffic routes in nagpur to avoid traffic jams cwb 76 mrj
Show comments