गोंदिया : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपामुळे गोंदिया जिल्ह्यातही गोंधळाची स्थिती निर्माण झाली आङे. पेट्रोल टंचाईच्या भीतीपोटी वाहन चालकांनी मंगळवारी पहाटेपासून पेट्रोल पंपांवर गर्दी केली आहे. शहरातील पंपांवरील साठा संपण्याची चिन्हे असल्याने वाहन चालकांनी आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे.
हेही वाचा >>> अमरावती शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद; काही ठिकाणी लांबच लांब रांगा
दुपारपर्यंत शहरातील बहुतांश पेट्रोल पंपातील साठा संपणार, अशी शक्यता पेट्रोल डीलर्स असोसिएशनकडून वर्तवण्यात आली आहे. सोमवारी गोंदियात वाहन चालकांनी जाळपोळ आणि आंदोलन केले. यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांची स्वत:च शाळेत येण्या-जाण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना खासगी शाळांनी केली आहे. एस.टी. बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र, खासगी वाहतूक बंद असल्यामुळे आज एसटी बसेसमध्ये मोठी गर्दी पहायला मिळत आहे.