अकोला: चारित्र्यावरून संशय घेत त्रास देणाऱ्या पतीची हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नीला अकोट जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. १५ हजार रुपयांचा दंड देखील न्यायालयाने ठोठावला आहे. तेल्हारा शहरातील संभाजी चौक येथील रहिवासी मंगला रमेश हागे हिला पती रमेश ओंकार हागे (५०) हे चारित्र्याच्या संशयावरून त्रास देत होते. त्यामुळे कंटाळलेल्या पत्नीने १० मार्च २०१९ रोजी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास झोपलेला पतीच्या डोक्यावर लोखंडी मुसळाने वार करून हत्या केली. पतीच्या मृतदेहावर लाकडी काठ्या व रॉकेल टाकून पेटवून दिले. घरामध्ये रक्त सांडलेले असल्याने पत्नीने ते धुतले. जळत असलेल्या मृतदेहावर पत्नीने पाणी टाकले. आरोपी पत्नीने अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाजवळ चिठ्ठी लिहून ठेवली. पतीने आत्महत्या केल्याचा बनाव पत्नीने केला.

हेही वाचा >>> बाळविक्रीचे ‘कर्नाटक कनेक्शन’; ३ दिवसांच्या बाळाची ५ लाखांत विक्री

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा

दरम्यान, याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी केलेल्या तपासात पत्नीने पतीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सरकारतर्फे पो.उप.नि. सुधाकर गवारगुरू यांच्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षावतीने एकूण १३ साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या. यामध्ये आरोपी मंगला हिच्या मुला-मुलीची देखील साक्ष नोंदवण्यात आली. साक्षी-पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी पत्नीला दोषी ठरवले. आरोपीला जन्मठेप व १५ हजार दंड, दंड न भरल्यास तीन वर्षांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. भादंविच्या २०१ कलमांतर्गत आरोपीस पाच वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजारांचा दंड ठोठावण्यात आला. आरोपीने दंड न भरल्यास सहा महिन्यांची आणखी शिक्षा भोगावी लागेल. दोन्ही दंड न भरल्यास कारावासाच्या शिक्षा स्वतंत्रपणे भोगाव्या लागणार आहेत. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. अजित देशमुख यांनी बाजू मांडली. पैरवी म्हणून रामेश्वर राऊत यांनी काम पाहिले.