अकोला: चारित्र्यावरून संशय घेत त्रास देणाऱ्या पतीची हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नीला अकोट जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. १५ हजार रुपयांचा दंड देखील न्यायालयाने ठोठावला आहे. तेल्हारा शहरातील संभाजी चौक येथील रहिवासी मंगला रमेश हागे हिला पती रमेश ओंकार हागे (५०) हे चारित्र्याच्या संशयावरून त्रास देत होते. त्यामुळे कंटाळलेल्या पत्नीने १० मार्च २०१९ रोजी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास झोपलेला पतीच्या डोक्यावर लोखंडी मुसळाने वार करून हत्या केली. पतीच्या मृतदेहावर लाकडी काठ्या व रॉकेल टाकून पेटवून दिले. घरामध्ये रक्त सांडलेले असल्याने पत्नीने ते धुतले. जळत असलेल्या मृतदेहावर पत्नीने पाणी टाकले. आरोपी पत्नीने अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाजवळ चिठ्ठी लिहून ठेवली. पतीने आत्महत्या केल्याचा बनाव पत्नीने केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा