लोकसत्ता टीम
नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सना ऊर्फ हिना खान यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. परंतु, साडेतीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही अद्यापपर्यंत सना यांचा मृतदेह गवसलेला नाही. मृतदेह मिळाला नसला तरी आरोपी विरुद्ध भक्कम असे तांत्रिक पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
आणखी वाचा-अकोला : शिवसेना ठाकरे गटाला तोडफोड करणे भोवले, जिल्हा प्रमुखासह शिवसैनिकांवर गुन्हा
जबलपुरातील कुख्यात गुन्हेगार अमित साहूने सना यांना कट रचून प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि प्रेमविवाह केला. अमितने सना यांना काही जणांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य केले. तिच्याशी केलेल्या शारीरिक संबंधाचे छायाचित्र आणि चित्रफिती बनवल्या. त्या प्रसारित करून बदनामी करण्याचे आमिष दाखवून शाहने अनेकांकडून पैसे उकळले. दोघांत वाद झाल्यामुळे सना खान यांची २ ऑगस्टला जबलपुरात हत्या करण्यात आली. मात्र, सना यांचा मृतदेह अद्याप न आढळ्यामुळे आरोपी सुटण्याची शक्यता बळावली आहे.