लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा: प्रेमात नकार सहन करण्याची मानसिकता नसलेल्या युवा पिढीच्या हातून नको ते गुन्हे घडत असतात. या घटनेत आरोपी कौस्तूभ सेलवते याचे तेवीस वर्षीय युवतीसोबत तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते. आईवडिलांनी लग्न करू देण्याचे नाकारल्याने मुलीने संबंध तोडले. गत एक वर्षापासून दुरावा राखला तरीही आरोपी संबंध जोडायचा येनकेन प्रयत्न करायचा.

आणखी वाचा-नागपूर: महिला डॉक्टरचे अश्लिल चलचित्र, ‘त्या’ डॉक्टरला अटक

नाकाराने संतप्त असलेल्या आरोपीने घटनेवेळी मुलगी किराणा दुकानाकडे जात असताना पाठलाग केला. दुचाकीवर मित्रासह हातात शिशी घेवून आरोपी पाठलाग करीत असल्याचे पाहून मुलगी घाबरत पळू लागली. ती पळत असतानाच आरोपीने शिशितील एसिड सदृश द्रवरूप पदार्थ मुलीच्या अंगावर फेकला. मात्र काहीच थेंब तिच्या मानेवर पडले. त्यात ती जखमी झाली. मानेचा भाग जळला, अशी तक्रार तिने रामनगर पोलीसांना दिली. घटना ऐकून पोलीस तात्काळ कामाला लागले. आरोपी सेलवटे यास अटक करण्यात आली असून त्याचा मित्र फरार झाला आहे.