वर्धा : सहलीला जाण्याची सर्वांनाच ओढ असते. त्यात विदेशात जाण्याची संधी मिळत असेल तर मग आनंदाला उधाण येणारच. या पार्श्वभूमीवर असंख्य ट्रॅव्हल्स कंपन्या स्थापन झाल्या आहेत. तसेच काही टूर आयोजित करणारे व्यवसायिकही आहेत. त्यातच डमी दलालही कार्यरत झाले असून फसवणुकीचे प्रकार ते करीत असल्याचे यापूर्वी अनेकदा उघडकीस आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशाच एकाने वर्धेकर महिलांची फसवणूक केल्याची बाब उजेडात आली आहे. स्थानिक महादेवपुरा येथे ममता मनोज देशमुख या गृहिणी राहतात.त्यांच्या शेजारी असलेल्या रेखा अडसूले व त्यांच्या एक आप्त या सहा जानेवारीस थायलंड ट्रिपवर जाणार होत्या. ही बाब त्यांनी ममता देशमुख यांना सांगितली. तेव्हा त्या पण येण्यास तयार झाल्या. टूर आयोजित करणारा ठाणे येथील आशीष ठवळे  याच्याशी फोनवरून बोलणे झाले. ही माहिती त्यांनी सहकारी महिलांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली. सहा दिवसाचा टूर असून जाणे येणे, निवास व भ्रमंती असा एकूण खर्च प्रत्येकी ६७ हजार ८०० रुपये पडणार असल्याचे सांगण्यात आले. ते मान्य झाल्यावर ममता देशमुख यांनी ठवळे यास फोन पे द्वारे १५ ऑक्टोबर २०२२ रोजी २५ हजार, ४ नोव्हेंबर २०२२ रोजी २० हजार ८०० तसेच ८ डिसेंबर २०२२ रोजी वीस हजार रुपये पाठविले. त्यानंतर विदेशी चलणासाठी  परत १५ हजार ३०० रुपये पाठविले.

हेही वाचा >>>माकडाला झाडावर उलटे टांगून अनन्वित अत्याचार; वन्यजीवप्रेमींकडून कारवाईची मागणी

यानंतर त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील कृष्णा हाडके, माला हाडके, अनिता झाडे, अनुश्री झाडे, रमेश हिवसे, वर्षा हिवसे, नीलिमा खंडार, वैशाली अडसूळ, रेखा अडसूळ, अंजली शेरजे, वंदना देशमुख, प्रिया कांबळे, अभिषेक कांबळे या सर्वांनी प्रत्येकी ६७ हजार ८०० रुपये ठवळे यास पाठविले. तसेच अतिरिक्त खर्चचे मिळून एकूण १० लाख २२ हजार ७०० रुपये ठवळे याने घेतले. मात्र प्रवासाची बनावट विमान तिकिटे पाठवून दिली. टूरची पूर्ण तयारी करीत हे सर्व आनंदात ठरल्या दिवशी मुंबई विमानतळावर पोहचले. एजेंट ठवळे याची वाट बघू लागले. मात्र तो आलाच नाही. तेव्हा महिलांनी त्याच्या घरी जाऊन शोध घेतला. पण तिथेही तो आढळून आला नाही. पुढे पैसेही परत केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांनी शहर पोलीसांकडे तक्रार केली. तसेच सायबर पोलिसांनीही गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheated women by telling them to give foreign tour wardha pmd 64 amy
Show comments