लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बुलढाणा: कृषिप्रधान जिल्ह्यातील बाजार समित्यामधील अडते व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची कोट्यवधीची फसवणूक होत असून याकडे यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी व संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी स्थानिय ‘शाहू परिवार’चे अध्यक्ष संदीप शेळके यांनी थेट पणन संचालक व जिल्हा दंडाधिकारी यांना साकडे घातले. केवळ हस्तक्षेप व कारवाईची मागणी न करता त्यांनी काही परिणामकारक उपाय देखील सुचविले आहे.
अलीकडे अडते- व्यापाऱ्यांकडून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या घटना वाढल्या आहे. चिखली बाजार समितीच्या तिघा अडत्यानी त्यांना विश्वासाने शेतीमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांची १० ते १२ कोटींनी फसवणूक केल्याचे उघड झाले. शेतकऱ्यांचा हक्काचा मोबदला देण्याचे टाळून त्यांनी स्वतःला नादार( दिवाळखोर) घोषित करण्याचा खटाटोप केला. मोताळा तालुक्यातील एकाच परिवारातील सदस्य असलेल्या दोघा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची सुमारे ८ कोटींनी फसवणूक केली. यामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागले आहे.
आणखी वाचा- लग्नपत्रिका वाटून घरी परतणाऱ्या पित्याचा अपघाती मृत्यू; मोताळा तालुक्यातील दुर्देवी घटना
या पार्श्वभूमीवर आज संदीप शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा माध्यमाने थेट पणन संचालकांना साकडे घातले. त्यांनी यावेळी दिलेल्या निवेदनाद्वारे या गोरखधंद्याची माहिती देऊन शेतमाल विपणन कायदा १९६३ ची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करण्याची मागणी रेटली आहे. या कायद्यात शेतकऱ्यांनी बाजार समितीमार्फत विकलेल्या मालाचा २४ तासांत मोबदला द्यावा अशी तरतूद आहे.
सुचविले हे उपाय
दरम्यान संदीप शेळके यांनी याचबरोबर शेतकऱ्यांच्या राजरोस फसवणूकीस लगाम लावण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहे. शेतमाल विपणन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. शेतकऱ्याने विकलेल्या मालाचा मोबदला २४ तासांत त्याच्या खात्यात जमा करावा वा रोख स्वरूपात द्यावा.अडते व व्यापाऱ्यांच्या दैनिक व्यवहारांची बाजार समिती व पणन संचलनालयाकडे नोंद असावी आणि या नोंदीची नियमित पाहणी करण्यासाठी भरारी पथके नेमण्यात यावी. तसेच पैसे बुडविणाऱ्यांची मालमत्ता जप्त करुन त्यातून बळीराजाचे पैसे चुकते करण्यात यावे, अशी मागणीही शेळके यांनी केली आहे.