नागपूर : राज्यातील अनेक भागांत ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सर्वाधिक रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात असून राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण आढळले आपण बघू या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होते. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. या रुग्णांनी स्वत:ला घरामध्ये विलगीकरण करणे गरजेचे आहे. या आजाराचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्यात वेगाने होतो. त्यामुळे रुग्णाने वारंवार हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे, डोळ्यांना हात न लावून या आजाराला प्रतिबंध करण्याची गरज आहे.

हेही वाचा – संतापजनक! सात महिन्यांच्या गर्भवतीवर दोन सख्या भावांचा बलात्कार

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार ९ ऑगस्ट २०२३ पर्यंत बुलढाणा जिल्ह्यात ४४,३९८ रुग्ण आढळले आहेत. पुण्यात २८,०४२, जळगाव २२,४१७, नांदेड १८,९९६, चंद्रपूर १५,३४८, अमरावती १४,७३८, परभणी १४,६१४, अकोला १३,७८७, धुळे १३,२७३, वर्धा ११,३०३, नंदुरबार १०,२९४, भंडारा १०,०५४, वाशिम ९,४५८, यवतमाळ ९,४४१, नांदेड महापालिका क्षेत्र ८,८५५, मालेगांव जि. नाशिक महापालिका ८,६५५, लातूर ७,०३९, औरंगाबाद ६,८३९, पुणे महापालिका ६,७२०, गोंदिया ६,५३२, जालना ६,५०६, पिंपरी चिंचवड महापालिका ६,०१०, हिंगोली ५,७८०, नाशिक ५,५७५, अहमदनगर ४,९९२, कोल्हापूर ४,७०२, औरंगाबाद महापालिका ४,६४३, नागपूर महापालिका ४,६२०, सोलापूर ४,२८२, नाशिक महापालिका ३,१८३, नागपूर ग्रा. ३,०६३, मुंबई २,८६२, गडचिरोली २,७९६, पालघर १,९७७, उस्मानाबाद १,९१०, सांगली महापालिका १,८४८, बीड १,६६६, सांगली १,५४०, सातारा १,५३८, धुळे महापालिका १,०६५, रायगड ८१६, नवी मुंबई महापालिका ७९०, सिंधुदुर्ग ६७९, लातूर महापालिका ५५५, चंद्रपूर महापालिका ४२९, ठाणे महापालिका ४१४, सोलापूर महापालिका ४०६, पनवेल महापालिका ३२४, अहमदनगर महापालिका २२३, रत्नागिरी २२२, ठाणे १७६, परभणी मनपा १६६, अकोला मनपा १५१, भिवंडी निजामपूर महापालिका १३३, वसई विरार महापालिका १३०, मीरा भाईंदर महापालिका १०८, कोल्हापूर महापालिका ७४, कल्याण – डोबिंवली महापालिका ५८ आणि सर्वात कमी उल्हासनगर महापालिका २० रुग्ण आहेत. अशाप्रकारे ३ लाख ५७ हजार २६५ रुग्ण राज्यात आढळले आहेत.

हेही वाचा – नागपूर: भाजप नेत्या सना खान यांची हत्या करणाऱ्या अमितला अखेर अटक

आरोग्य विभाग काय म्हणतो?

आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ज्या भागामध्ये डोळे येण्याची साथ सुरू आहे, त्या भागामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांना आरोग्य शिक्षणाचे प्रोटोटाईप तयार करून देण्यात आले आहे. ज्या भागामध्ये साथ सुरू झाली आहे. त्या भागातील शाळेतील मुलांची डोळ्यांची तपासणी करून उपचार केले जात आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत. राष्ट्रीय विषाणू संस्था व राज्यातील शीघ्र प्रतिसाद पथकाने आळंदी येथील साथीचे अन्वेषण केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Check the number of patients in buldhana which district of the maharashtra has the highest number of eye patients mnb 82 ssb
Show comments