नागपूर : मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांना आता मध्यप्रदेश नाही तर उत्तरप्रदेशचा परिसर आवडायला लागला आहे. या आधी कुनोतून ‘ओबान’ या चित्त्याने दोनदा पलायन केले होते. तर आता मादी चित्ता ‘आशा’देखील तब्बल २०-२५ दिवसांपासून बाहेर आहे.

आशा १९ मे पासून कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर होती. यापूर्वी व्यवस्थापन आणि देखरेख पथक चित्ता आशा स्वतःहून परत येण्याची वाट पाहत होते, मात्र माधव राष्ट्रीय उद्यानमध्ये अनेक दिवस राहिल्यानंतर आशा पुढे सरकली आणि अशोकनगरला पोहोचली. जिथे ती उत्तरप्रदेशच्या सीमेवर आणि रहिवासी भागात घुसण्याची शक्यता होती. त्यामुळेच वनविभागाला बचाव करावा लागला. ‘आशा’ ला मोकळ्या जंगलात सोडल्यानंतर तीने तीन वेळा उद्यानाची हद्द ओलांडली होती, पण दूरच्या जंगलांत जाऊन ती स्वतःच उद्यानात परतली.

Nagpur sikandarabaad Vande Bharat Express coaches to be reduced
टीसचा अहवाल जाहीर करा, आदिवासी संघटनांची मागणी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
mirkarwada latest news martahi news
रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण मोहिमेविरोधात न्यायालयाचे जिल्हाधिकारी, मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना समन्स
There was no competition for post of guardian minister of Satara says Shambhuraj Desai
साताऱ्याच्या पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा नव्हतीच- शंभूराज देसाई
archana patil chakurkar marathi news
अर्चना चाकुरकरांच्या प्रश्नामुळे भाजपमधील जुन्या – नव्याचा वाद पुन्हा चव्हाट्यावर
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !
Mirakwada port will be more advanced than Malpi port
मलपीपेक्षाही मिरकवाडा अत्याधुनिक बंदर होणार
radhakrishna vikhe patil statement on baramati district creation
बारामती स्वतंत्र जिल्हा निर्मितीची अफवा; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

हेही वाचा – वर्धा : बनावट बियाण्यांची फॅक्टरी उजेडात, कोट्यवधींचा साठा जप्त

यावेळी १९ मे रोजी ती कुनो राष्ट्रीय उद्यानातून बाहेर पडली. येथून निघून गेल्यानंतर आशा शिवपुरी जिल्ह्याच्या सीमेवर सुमारे १७-१८ दिवस राहिली. त्यानंतर तिने शिवपुरीतील माधव राष्ट्रीय उद्यान पार केले आणि अशोकनगरच्या दिशेने निघाली. गेल्या काही दिवसांपासून ती अशोकनगर जिल्ह्यातील इसागडजवळील जंगलात होती. पुढे लोकवस्तीचा परिसर असल्याने उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी तिला पकडण्याचा निर्णय घेतला, पण हा प्रयत्न यशस्वी झाला नाही.

Story img Loader