नागपूर : लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुतीच्या सरकारने नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग तूर्तास थंडबस्त्यात टाकला आहे. मात्र, इंडिगोने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपूर या शहरांना गोव्याला हवाई मार्गाने जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिगोची गोवा- नागपूर (मार्गे नाशिक) विमानसेवा १ जुलै २०२४ पासून सुरू होत आहे. ही सेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी राहील. गोवा येथून दुपारी २.१० वाजता निघेल आणि नागपुरात सायंकाळी ६.१० वाजता पोहोचेल. नागपूर-गोवा (मार्गे नाशिक) विमानसेवा १ जुलैपासून सुरू होत आहे. ही सेवा सोमवार, बुधवार, गुरुवार आणि रविवारी राहील. नागपूर येथून सकाळी ९.४० वाजता निघेल आणि गोव्यात दुपारी १.३० वाजता पोहोचेल.

गोवा-छत्रपती संभाजीनगर विमानसेवा २ जुलैपासून सुरू होत आहे. ही सेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवारला राहणार आहे. गोवा येथून दुपारी २.१० वाजता निघेल आणि औरंगाबादला दुपारी ४.१० वाजता पोहोचेल.

हेही वाचा – शाळेतील मुलांच्या डब्यात आता जंक फूड नको, तर… प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे मत

छत्रपती संभाजी नगर-गोवा विमानसेवा २ जुलैपासून सुरू होत आहे. ही सेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी असणार आहे. औरंगाबाद येथून सकाळी ११.३० वाजता निघेल आणि गोव्याला दुपारी १.३० वाजता पोहोचेल.

गोवा- नागपूर (मार्गे छत्रपती संभाजीनगर) विमानसेवा २ जुलैपासून सुरू होत आहे. ही सेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी असणार आहे. गोवा येथून दुपारी २.१० वाजता निघेल आणि नागपूर येथे सायंकाळी ६.१० वाजता पोहोचेल.

नागपूर- गोवा (मार्गे औरंगाबाद) विमानसेवा २ जुलैपासून सुरू होत आहे. ही सेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी राहील. नागपूर येथून सकाळी ९.४० वाजता निघेल आणि गोव्याला दुपारी दीड वाजता पोहोचेल.

हेही वाचा – “नो काँगेस, नो भाजपा, ओन्ली रिपब्लिकन”; संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या बैठकीत…

दरम्यान, स्टार एअरची नागपूर ते नांदेड विमानसेवा २७ जूनपासून सुरू होत आहे. ही सेवा सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार असे चार दिवस राहणार आहे. नागपूर ते नांदेड विमान नागपूरहून सकाळी ९.१५ वाजता निघेल आणि नांदेडला १०.०५ वाजता पोहोचेल. नांदेडहून दुपारी १.१० वाजता विमान निघेल आणि दुपारी २ वाजता नागपुरात पोहोचेल.

विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रदेशातील महत्त्वाची आर्थिककेंद्रे म्हणून नागपूर आणि औरंगाबादला पाहता येईल. या दोन्ही शहरादरम्यान होणारे दैनंदिन आवागमन लक्षणीय असे आहे. प्रामुख्याने नागपूरहून छत्रपती संभाजीनगर वा छत्रपती संभाजीनगरहून नागपूरला येण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सचा उपयोग करण्यात येतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati sambhajinagar nashik and nagpur cities will be connected to goa by filght service shaktipeeth highway plan is shutdown temporarily rbt 74 ssb