चंद्रपूर : ताडोबातील छोटा मटका व बजरंग या दोन वाघांची शिकारीवरून जिवघेणी झुंज झाली. यात बंजरंग वाघाचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी छोटा मटका अचानक बेपत्ता झाला. अखेर त्याचा शोध लागला असून १७ नोव्हेंबरला सकाळी नवेगाव मडो परिसरातील कक्ष क्रमांक ५७ मध्ये लावण्यात आलेल्या ‘ट्रॅप कॅमेरा’त तो भ्रमंती करताना टिपल्या गेला.
आणखी वाचा-चंद्रपूर: घरफोडीच्या आरोपाखाली एलसीबीच्या हवालदाराला अटक
छोटा मटकाच्या समोरील उजव्या पायाला व शरीरावर किरकोळ जखमा आहे. त्याच्या शोधासाठी कक्ष क्रमांक ५७ आणि कक्ष क्रमांक ५५ या क्षेत्रात पंधरा ‘ट्रॅप कॅमेरे’ लावण्यात आले होते. सोबतच ६५ वनकर्मचाऱ्यांनी पायदळ गस्त घातली.