लोकसत्ता टीम

वर्धा : लोकशक्तीतून गावाचा विकास करण्याचा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी देऊन ठेवला. सर्व एकत्र आले तर गावाचा नावलौकिक वाढू शकतो, याचे हे उदाहरण. अपारंपरिक ऊर्जा हा आता परवलीचा शब्द ठरत आहे. सौर ऊर्जा त्यात महत्वाची म्हणून पंतप्रधान मोफत सूर्यघर ही योजना आली. केंद्राच्या या योजनेच्या अनुषंगाने मॉडेल सोलर व्हिलेज विद्युत विभागाने साकारण्याचे ठरवले. हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट( राठी) या गावाची निवड झाली.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…

७० घरे व अवघी १८७ लोकसंख्या असलेल्या या गावात २८ टीनाची व कौलारू घरे पण आहेत. ही सर्व घरे आज सौर ऊर्जेत न्हावून निघाली आहे. औद्योगिक वसाहतीला खेटून असलेल्या या गावात विविध अडचणी. कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांनी चंग बांधला. बँक ऑफ बडोदाची मदत घेण्यात आली. नंतर अधिकारी वर्गाने गावात कार्यशाळा घेणे सूरू केले. सौर ऊर्जा किती फायद्याची व कसलाच धोका नसल्याची बाब गळी उतरविण्यात आली. मग लाभार्थी गावाकऱ्यांना थेट लाभ कसा मिळवून देता येइल यादृष्टीने प्रयत्न सूरू झाले. अवघ्या तीन महिन्यात सर्व काम पूर्णत्वास गेले. आणि चिचघाट हे विदर्भातील पहिले आदर्श सौरग्राम ठरले. हे गाव आता सौर ऊर्जेत उजळून निघणार. शंभर टक्के कार्य सौर उर्जेंवरच चालणार. मधात आर्थिक अनेक अडचणी आल्यात. पण त्या मार्गी लागल्यात.

आणखी वाचा-आमदार राजू कारेमोरेंच्या अडचणीत वाढ, उच्च न्यायालयात याचिका दाखल

आता जिल्ह्यातील अन्य गावे सौर ऊर्जामय करण्याचा मानस विद्युत विभागाने ठेवला आहे. चिचघाट ही सुरवात असल्याचे ते म्हणतात. खरं तर कौलारू व टीनाच्या झोपड्यात ही प्रणाली कशी अंमलात आणायची हा पेच होता. पण गावाकऱ्यांचा प्रतिसाद व उत्साह कामी आल्याने समस्या सुटल्या. लाभार्थी होण्यासाठी व्यक्तिगत आर्थिक योगदान आवश्यक असते. म्हणून ती बाब मोठी अडसर ठरली होती. पण त्यासाठी कर्ज मिळाले. शासनाच्या जन समर्थ या पोर्टल मार्फत सौर प्रकल्पसाठी आवश्यक अर्थसाहाय्य बँक ऑफ बडोदाने उपलब्ध करून देत अडचण दूर केली. म्हणून या सौर प्रकल्पास १०० टक्के आर्थिक सहकार्य लाभले, ही महत्वाची बाब असल्याचे विद्युत विभागाचे अधिकारी सांगतात. असे अडथळे पार करीत चिचघाट राठी हे विदर्भात अव्वल आले. या गावाची प्रेरणा अनेक गावांना मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केल्या जातो.

Story img Loader