नागपूर : सेवा आणि न्याय दोन्ही भिन्न आहेत. आपण सेवा करून एखाद्याचे दुःख काही क्षणासाठी पुसू शकतो. परंतु, हे करून आपण त्याला त्याच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवतो. त्यामुळे, आपला लढा हा सेवा देण्यासाठी नव्हे, तर न्याय हक्क मिळवून देण्यासाठी राहायला हवा, असे आवाहन सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी केले.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूरचा पहिला दीक्षांत सोहळा ११ फेब्रुवारीला पार पडला. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हेही वाचा – भोंदूंपासून सावधान! भीक्षा मागण्यासाठी आले अन् साडेसातीची भीती दाखवून…
हेही वाचा – पदवीधर, शिक्षकमधील पराभवानंतर भाजपाची महापालिकेसाठी ‘वॉर रूम’
सेवा देऊन आपण कुणाला न्याय देऊ शकत नाही, हे वकिलांनी लक्षात ठेवायला हवे. सेवा कार्य महान आहे, यात वाद नाही. परंतु, यामुळे आपण त्या व्यक्तीला त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवतो, हे विसरून चालणार नाही. परिणामी, आपले कार्य हे न्याय मिळवून देण्यासाठी राहायला हवे. विकिली व्यवसाय करताना प्रत्येकाने भारतीय संविधानातील मुल्ये जपायला हवी. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय मिळवून देण्याची जबाबदारी संविधानाने दिली आहे, हे विसरून चालणार नाही. या हक्कांसाठी आपल्याला बोलावे लागेल. शांत राहून समस्या सुटत नाही, त्यामुळे बोलणे आवश्यक आहे, असा सल्लाही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिला.