नागपूर : महाराष्ट्रात तीन वर्षांत नक्षलवाद पूर्णपणे आटोक्यात आणण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत व्यक्त केला. मुंबई-गोवा महामार्गातील अडथळे दूर करून अनेक वर्षे रखडलेले हे काम लवकरच पूर्ण होईल आणि ठाणे शहर विकास आराखड्याला मंजुरी देण्याची प्रक्रियाही सुरू केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

भाजपने जाहीरनाम्यात दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाबाबत कधी निर्णय घेणार, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. त्यावर भाजपने जाहीरनाम्यात दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता निश्चितपणे केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “कधी कधी काही घटना घडतात, पण…”; मुंबईत सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…
Maharera , Registration , New Housing Project,
स्वयंविनियामक संस्थेतील प्रतिनिधींची आता दोन वर्षांसाठीच नियुक्ती, दोन वर्षांनंतर प्रतिनिधी बदलावे लागणार
cm devendra fadnavis address party workers at bjp state convention
सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
Sanjay Raut on Mahavikas aghadi
Sanjay Raut : महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, “काँग्रेसच्या केंद्रीय समितीने…”

विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना फडणवीस यांनी शहरी नक्षलवाद, विदर्भ-मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेले सिंचन प्रकल्प, औद्याोगिक प्रकल्प आणि अन्य महत्त्वाच्या प्रकल्पांविषयी माहिती दिली.

हेही वाचा >>>महाविकास आघाडी म्हणते…सरकारने शेतकरी, कष्टकरी, तरुण, उद्योजकांच्या तोंडाला पाने पुसली !

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १३ वर्षे सुरू असून आणखी १० वर्षे लागतील, अशी टिप्पणी शिवसेना (ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी केली होती. या महामार्गाच्या कामात अनेक अडथळे आले. त्यामुळे मी हिमालयातही रस्ते बांधणीचे काम पूर्ण केले, या महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीही संसदेत सांगितले होते. या महामार्गाचे दोन कंत्राटदार दिवाळखोरीत गेले व अन्यही अनेक अडथळे आले. या प्रकल्पातील अडचणी सोडवून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

ठाणे शहराच्या विकास आराखड्याबाबत सुमारे आठ हजार हरकती-सूचना आल्या आहेत. त्यावर सुनावणी घेऊन नगरविकास विभागाकडून पुढील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.

सरकारने अनेक उपाययोजना केल्याने आता नक्षलवाद्यांची नवीन भरती बंद असून छत्तीसगड व ओरिसामध्ये नवीन भरती होत आहे. पण पुढील काळात कठोर कारवाई करून नक्षलवादाचा बीमोड करण्यात येईल. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Story img Loader