नागपूर : हिवाळी अधिवेशनात सरकार चर्चेपासून पळत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या आरोपांना आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. विरोधकांना हव्या त्या विषयावर चर्चेसाठी सरकार तयार आहे. विरोधकांनी केवळ राजकारण करू नये, असे फडणवीस म्हणाले. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फडणवीस माध्यमांशी संवाद साधत होते. विरोधकांनी पुरवणी मागणी करावी, सरकार त्यावर योग्य चर्चा करेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. ईवीएम च्या मुद्यावर देखील फडणवीस यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. विरोधकांनी मशीन ला दोष देत बसू नये तर आत्मचिंतन करावे. नाहीतर त्यांना असाच पराभव पत्करावा लागेल.
हेही वाचा : “आता मंत्रीपद दिले तरी घेणार नाही,” विजय शिवतारेंची उद्विग्न प्रतिक्रिया
मुनगंटीवार नाराज नाही
सुधीर मुनगंटीवार यांना मंत्री मंडळात न घेतल्याने ते नाराज असल्याचा चर्चा वर देखील फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. मुनगंटीवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी मी स्वतः चर्चा केली आहे. ते नाराज नाही. सरकार आणि पक्ष दोन्ही एकत्रित चालवावे लागतात. केंद्रीय नेतृत्वाने मुनगंटीवार यांच्यासाठी काहीतरी विचार केला असल्याने त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले नाही, असे फडणवीस म्हणाले.