गोंदिया : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर यांचा दौरा तपासला तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली वारी मध्येच जास्त वेळ घालवतात. राज्याच्या जनतेकरिता फक्त घोषणा देणे, दिल्लीवाले पंतप्रधान देशासाठी घोषणा करतात तसे हे राज्य वाले राज्यात घोषणांचा पाऊस पाडण्याचा काम करतात, शेतकऱ्यांना अद्याप मदत दिली गेली नाही, बेरोजगारांचे प्रश्न सोडवले नाहीत, महागाई कमी करू शकले नाही, त्यामुळे माझ्या मते तर हे डेपुटेशन वर असलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यांना कायम दर दोन दिवस आड दिल्ली मध्ये बोलाविले जाते आणि त्या दिल्ली दरबारी हुजरेगिरी करण्याचा काम राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतात अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी केली. नाना पटोले यांच्या वाढ दिवसानिमित्त सालेभाटा येथे त्यांची लाडू तुला करण्यात आली या प्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते. पुढे पटोले म्हणाले की अशी हुजरेगिरी महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नाही, नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी संभाजीनगर येथे सांगितले होते की आम्ही नरेंद्र मोदींचे हस्तक आहोत. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या  जनतेचे हस्तक नाहीच, त्यामुळे त्यांच्या कडून जास्त काही अपेक्षा करण्याचे कारण नाही, असे ही या प्रसंगी नाना पटोले म्हणाले.