नागपूर : गोंदिया ते सडक- अर्जुनी दरम्यान एसटीच्या शिवशाही बस अपघाताची बातमी समजताच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांना तातडीने १० लाख रुपयांची यांची मदत देण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. यात नागपुरकडून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस उलटली आहे. या अपघातात आतापर्यंत सुमारे ८ प्रवाश्यांचे मृतदेह बसमधून बाहेर काढण्यात आले आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे. या अपघातातील मृतांची संख्या वढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु आहे. तर या भीषण अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

हेही वाचा…निवडणुकीच्या घुसळणीत काही नव्या चेहऱ्यांचा उदय, लोकांना आस.

दरम्यान एसटीच्या सदर बस अपघाताची माहिती कळताच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने स्थानिक प्रशासनाकडून घटनेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर तातडीने जखमींना योग्य उपचार देण्याची सूचना केली गेली. सोबत अपघातातील मृतांना तातडीने १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेशही प्रशासनाला दिले. जखमींवरील उपचारात कमी पडू नये, असेही अधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याची माहिती आहे. घटनेनंतर तातडीने आरटीओ, एसटी महामंडळासह इतरही विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा…गोंदिया ते सडक अर्जुनी मार्गावर एसटी उलटली… बसमधून आठ मृतदेह बाहेर काढले…

देवेंद्र फडणवीसांकडून मृतांना श्रद्धांजली

गोंदियातील शिवशाही बसचा दुर्दैवी अपघाताची बातमी समजतात आता राजकीय वर्तुळातूनही हळहळ व्यक्त केली आहे. या अपघाताबद्दल आता देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा, असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकार्‍यांना सांगितले आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, ते मदतकार्यासाठी समन्वय करीत आहेत. या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असे देवेंद्र फडणवीस यांनी एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.