राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी नागपूर मार्गे भंडाऱ्यात आगमन होणार आहे. भंडाऱ्यात दुपारी ३ वाजता त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भात होणारी ही त्यांची पहिली सभा असेल.
हेही वाचा- अमरावती : इतर महिलांचा अपमान होत असताना ‘ते’ गप्प का होते – चित्रा वाघ
मुख्यमंत्र्यांचे दुपारी १२ ला मुंबईहून नागपूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते हेलिकॉप्टरने गोसेखुर्द प्रकल्पावर जाणार असून तेथे ते जल पर्यटन केंद्राची पाहणी करतील. तेथून हेलिकॉप्टरने भंडाऱ्याला जातील. तेथे दुपारी ३.३० वा. खात रोड रेल्वे मैदानावर जाहीर सभेला संबोधित करतील. त्यांच्यासोबत आमदार नरेंद्र भोंडेकर राहणार आहेत. या जाहीर सभेत युवा सेनेचे पूर्व विदर्भातील पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहे.