लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाशीम : शहरात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील महाले यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली काढण्यात आली. यावेळी रैली दरम्यान त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत जय श्री राम, जय हनुमान चा गजर केला.

आणखी वाचा-महाविकास आघाडीच्या नेत्यांची यवतमाळ-वाशिमकडे पाठ?

आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून शेवटच्या दिवसी वाशीम शहरात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील महाले यांच्या प्रचारार्थ सिव्हिल लाईन येथून मिरवणुकीला सुरवात झाली. पुढे ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गेली. यावेळी सजविलेल्या वाहनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचार करीत होते. शिवाजी महाराज चौकात दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवनपुत्र हनुमान की जय.. छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजश्री पाटील महाले, खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, अर्जुन खोतकर, आमदार मलिक आदीची उपस्थिती होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shindes rally to campaign for mahayuti candidate rajshree patil mahale pbk 85 mrj