नागपूर : विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखले जाणारे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा सध्या वाढत्या तापमानामुळे चर्चेत आले आहे.चिखलदरा (अमरावती) विदर्भातील थंड हवेचे ठिकाण अशी ओळख आहे. चिखलदरा या पर्यटनस्थळाला यावर्षी उन्हाचा फटका बसला आहे. चिखलदराचा पारा हा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे हिल स्टेशनऐवजी हे हॉटेस्ट डेस्टिनेशन ठरत आहे. याचा फटका स्थानिक हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे.

विदर्भाचे नंदनवन समजले जाणारे चिखलदरा शहर राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे. दरवर्षी राज्यभरातून दीड लाखांवर पर्यटक भेट देतात. जून महिन्यात पावसाळा सुरू झाला की, हजारो पर्यटकांचा ओढा याठिकाणी असतो. मात्र, यावर्षी उन्हाळ्यात चिखलदन्याच्या तापमानात वाढ झाली. सध्या पारा हा ३८ अंश पर्यटनस्थळावरील रस्त्यांवर शुकशुकाट असून, एकही पर्यटक दिसून येत नाही.विदर्भात सध्या पारा ४४ अंश सेल्सियस पर्यंत गेला आहे. चिखलदरा शहरात मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरण सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. यामुळे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

यावर्षीच्या उन्हाळ्यात उष्णतेमुळे चिखलदरा शहराकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. पर्यटक आले तेव्हाच याठिकाणी रोजगार मिळतो. पावसाळ्यात सातपुडडातील या भागात निसर्गसौदर्यात अधिकच भर पडते.भीमकुंड, पंचबोल पॉइंट, गाविलगड किल्ला, वन उद्यान या भागातील पर्यटनस्थळांवर नेहमीच गर्दी असते. पर्यटकांच्या भरवशावरच इथला व्यवसाय चालतो, मात्र, पर्यटकच नसल्याने येथे स्मशानशांतता आहे. पर्यटकांनी उन्हामुळे पाठ फिरवल्याने येथील हॉटेल व्यतमाय ठप्प पहला आहे.

विखलदरा पर्यटनस्थळी पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिकांचीच भटकंती होत आहे. दुसरीकडे पर्यटकांन हजारो रुपये खर्दून सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. पावसाळा, हिवाळा वगळता उन्हाळ्यात पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. मेळघाटातील रस्ते व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक नियमाने अडकले आहेत. दुसरीकडे पर्यटन उद्योगासाठी विभाग संवेदनशील आहे.मात्र, बोडखे जंगल, वन्यप्राण्यांसाठीच नैसर्गिक पाणवठे तयार करून जगवण्याचा प्रयत्न, जंगलात ठिकठिकाणी लागणाऱ्या आगी या गंभीर समस्यांपुढे हा विभाग हतबल उरला आहे.धबधबे, डोंगरातून वाहणारे पाणी, दन्या-खोऱ्यांमध्ये पसरलेली हिरवळ पर्यटकांना भुरळ घालते. वृक्ष संवर्धनासाठी मात्र कुणाचा पुढाकार नाही, याची खंत आहे.