नागपूर: धरमपेठ, मंगळवारी झोनमध्ये चिकनगुनियाने डोके वर काढल्याचे चित्र आहे. या दोन्ही झोनमध्ये मागील १८ दिवसांत तब्बल १४ रुग्णांची नोंद झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे.

चिकनगुनियाचे रुग्ण आढळलेल्या भागात धरमपेठ झोनमधील सुरेंद्रगड, के. टी. नगर, गिट्टीखदान तर मंगळवारी झोनमधील भूपेशनगर, बर्डे लेआऊट, बोरगाव या भागाचाही समावेश आहे. रुग्ण आढळलेल्या भागासह इतरही भागात कीटकनाशक फवारणी, जनजागृतीसह इतरही प्रतिबंधात्मक उपाय हाती घेण्यात आले आहेत.

Ursekarwadi, Dombivli, Skywalk staircase,
डोंबिवलीत उर्सेकरवाडीमधील स्कायवॉक जिन्याच्या पायऱ्यांवर प्रवाशांची घसरगुंडी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
pune telemedicine service introduced in remote areas of state
राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील जनतेला ‘टेलिमेडिसीन’ सेवेचा आधार!
gondia tiger death loksatta
गोंदिया : ‘टी १४ वाघिनी’च्या बछड्याच्या मृत्यू, ‘इन्फेक्शन’, निष्काळजीपणा की…
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
Cases of sudden hair loss in Shegaon taluka increased again
शेगावातील केसगळतीची रुग्णसंख्या १४९ वर, भयाची व्याप्ती वाढली
Villagers of Kundevhal Bambawipada suffer from respiratory problems due to dust from mines
कुंडेवहाळ, बंबावीपाडा ग्रामस्थांचे आयुष्य ‘माती’मोल; खदाणींच्या धुळीमुळे श्वसनाचे विकार, प्रशासनाचे दुर्लक्ष

हेही वाचा – नागपूर : उड्डाणपूल झाले तरी वाहनांची गर्दी, वाहतूक कोंडी…

संशयित रुग्ण आढळताच तपासणी केली जात आहे. सोबतच महापालिका, मेडिकल, मेयो रुग्णालयात आवश्यक औषध उपलब्ध ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, नागपूर शहरात जानेवारी २०२४ ते मे २०२४ दरम्यानच्या काळात एकही चिकनगुनियाच्या रुग्णाची नोंद नव्हती. परंतु जून महिन्याच्या १८ दिवसांत ४४ संशयितांच्या वैद्यकीय तपासणीत १४ रुग्णांना चिकनगुनिया असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दमट वातावरणामुळे रुग्णवाढ

शहरात वाढत्या गर्मीमुळे घरोघरी कुलर, वातानुकूलित यंत्र सुरू आहेत. सोबतच अनियमित पावसामुळे शहरातील वातावरण दमट झाले आहे. असे वातावरण डासांची घनता वाढवण्यासाठी पोषक आहे.

प्रतिबंधात्मक उपाय

कुलरमध्ये डासअळी होऊ नये म्हणून काळजी घेत वेळोवेळी पाणी स्वच्छ करावे. वातानुकूलित यंत्रात पाणी जमा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अडगळीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नये. डासअळी आढळलेली भांडी स्वच्छ करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

डेंग्यू १६, हिवतापाच्या एका रुग्णाची नोंद

महापालिका हद्दीत १ जानेवारी ते १८ जून २०२४ दरम्यान डेंग्यूचे १६ तर हिवतापाचा १ रुग्ण आढळल्याची माहिती आहे. त्यापैकी डेंग्यूचे ३ रुग्ण हे जून महिन्यातीलच आहेत, हे विशेष.

“महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आजार नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणी, जनजागृतीसह इतरही उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. नागरिकांनीही काळजी घेतल्यास हा आजार नियंत्रणात येईल.” – डॉ. दिलीप सेलोकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका.

हेही वाचा – अंबरनाथकरांना एक दिवसाआड पाणी, बदलापुरातही दोन दिवस टंचाईचे

चिकनगुनिया म्हणजे काय?

चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे तो प्रसारित केला जातो. रोगाचे पहिले निदान १९५३ मध्ये टांझानिया येथे झाले.

चिकनगुनियाची लक्षणं काय?

चिकनगुनिया हा तापाचा आजार आहे. ताप हा साधारण तीन ते चार दिवस असतो. ताप थंडी वाजून येऊ शकतो. सोबत डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, पुरळ येणे इत्यादी लक्षणं दिसू शकतात. पण तापासोबतचे मुख्य लक्षण म्हणजे सांधेदुखी. सांधेदुखी जोरदार असते. हातापायाचे छोटे आणि मोठे सगळेच सांधे दुखू शकतात. सांध्यांवर सूजसुद्धा येऊ शकते. हे दुखणं इतकं त्रासदायक असतं की पेशन्ट हवालदिल होतात. चिकनगुनिया या आफ्रिकन शब्दाचा अर्थ (दुखण्याने) वाकून गेलेला असा होतो. ही सांधेदुखी काही दिवस असते व ताप कमी झाल्यावर हळूहळू कमी होते. पण काही पेशंटमध्ये ही सांधेदुखी बराच काळ टिकू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेतल्याने ही सांधेदुखी बरी होण्यासारखी असते. चिकनगुनियाचं दुखणं हे तीव्र स्वरुपाचं असलं तरी या आजारात जिवाला धोका होत नाही. डेंग्यूत ज्याप्रमाणे रक्तवाहिन्या पाझरून रक्तदाब (बीपी) कमी होऊ शकतो किंवा इतर अवयवांवर परिणाम होऊ शकतो तसे गंभीर परिणाम चिकनगुनियात सहसा दिसत नाहीत. त्यामुळे घरी आराम करून इलाज करण्यासारखा हा आजार आहे. पण हे नेहमी लक्षात ठेवावं की तुम्हाला चिकनगुनिया वाटणारा आजार हा दुसरा ताप असण्याची शक्यता असू शकते. तापाचे बरेच आजार पहिल्या काही दिवसांत सारखेच दिसतात.

Story img Loader