नागपूरः उपराजधानीत चिकनगुनियाने डोके वर काढले आहे. मागील ३५ दिवसांमध्ये या आजाराचे तब्बल ३७ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनियमित पावसामुळे शहरातील वातावरण दमट झाले आहे. असे वातावरण डासांची घनता वाढवण्यासाठी पोषक असते. त्यातूनच शहरात ‘एडीस’ जातीचे डास वाढून चिकनगुनिया वाढत आहे. धरमपेठ, मंगळवारी झोनमध्ये चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण नोंदवले गेले. या दोन्ही झोनमध्ये मागील ३५ दिवसांत (१ जून ते ५ जुलै २०२४) तब्बल ३७ रुग्णांची नोंद झाली. कीटकनाशक फवारणी, जनजागृतीसह इतरही प्रतिबंधात्मक उपाय हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता या आजारावर नियंत्रण असल्याचा महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा आहे. नागपुरात जानेवारी २०२४ ते मे २०२४ दरम्यानच्या काळात चिकनगुनियाच्या एकही रुग्णाची नोंद नव्हती. परंतु जून महिन्यात ३० तर जुलै महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत ७ रुग्णांची नोंद झाली. या आकडेवारीला महापालिकेच्या आरोग्य विभागाने दुजोरा दिला.

हेही वाचा >>>नागपूर: पावसामुळे मुंबईचे विमान रद्द, विदर्भ एक्सप्रेसला १२ तास विलंब

‘या’ परिसरात जास्त रुग्ण…

चिकनगुनियाचे रुग्ण आढळलेल्या भागात धरमपेठ झोनमधील सुरेंद्रगड, के. टी. नगर, गिट्टीखदान तर मंगळवारी झोनमधील भूपेशनगर, बर्डे लेआऊट, बोरगाव या भागांचा समावेश आहे.

शहरातील स्थिती

महिना    संशयितांची संख्या      रुग्णसंख्या

जून-             ८२                        ३०

जुलै-             २३                        ०७

एकूण         १०५                         ३७

चिकनगुनिया म्हणजे काय?

चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार आहे. हा ताप साधारण तीन ते चार दिवस असतो. ताप थंडी वाजून येऊ शकतो. सोबत डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, पुरळ येणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. तापासोबतचे मुख्य लक्षण म्हणजे सांधेदुखी. हातापायाचे छोटे आणि मोठे सगळेच सांधे दुखू शकतात. सांध्यांवर सूजसुद्धा येऊ शकते. या आजारात जीवाला धोका नाही. त्यामुळे योग्य उपचार घेतल्यास रुग्ण सहज बरा होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>>विधान परिषद निवडणुकीत मराठा आमदार ओबीसीं उमेदवारांना मतदान करतील ?

चिकनगुनियाचे निदान

चिकनगुनिया साठी रक्ताची तपासणी आजाराच्या साधारणतः एक आठवड्यानंतर करतात. अँटिबॉडीची ही तपासणी चिकनगुनिया आहे की नाही हे सांगू शकते. ही तपासणी डॉक्टरांच्या निदानाला पूरक म्हणून करतात. इतर तापाच्या आजारांची शक्यता फेटाळून लावण्यासाठी डॉक्टर इतरही काही तपासण्या सांगू शकतात.

चिकणगुणिया स्रोत

चिकुनगुनिया विषाणूचा मुख्य स्त्रोत किंवा जलाशय मानव हे आहेत. तथापि, आफ्रिकेमध्ये चिकनगुनिया विषाणूचे नैसर्गिक यजमान हे जंगलात राहणाऱ्या एडीस डासांनी चावलेले वन्य प्राणी आहेत. हा विषाणू टोगाविरिडे कुटुंबातील, अल्फाव्हायरस वंशातील सिंगल-स्ट्रॅन्ड पॉझिटिव्ह-सेन्स आरएनए एन्व्हलप्ड व्हायरस आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chikungunya outbreak in nagpur which area has the highest number of patients mnb 82 amy
Show comments