नागपूरः जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात ‘डेंग्यू’चे रुग्ण वाढले असतानाच आता चिकनगुनियाही डोके वर काढत आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात चिकनगुनियाचे ४ नवीन रुग्ण आढळल्याने या आजाराची रुग्णसंख्या ७ झाली आहे.
जिल्ह्यात २४ जुलै २०२३ पर्यंत डेंग्यूचे ८२ रुग्ण आढळले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांपैकी निम्म्याहून जास्त रुग्ण हे गेल्या मम्नान्याभरातील आहेत. आता चिकनगुनियाही डोके वर काढत आहे. १ जानेवारी २०२३ ते १५ जून २०२३ पर्यंत जिल्ह्यात चिकनगुनियाचे केवळ ३ रुग्ण होते. परंतु गेल्या महिनाभरातच शहरी भागात २, ग्रामीणला २ असे एकूण ४ नवीन रुग्ण आढळले. मेयोच्या प्रयोगशाळेतील अहवालात या रुग्णांना चिकनगुनिया असल्याचे स्पष्ट झाले. चिकनगुनियाचे रुग्ण आढळल्याच्या वृत्ताला महापालिका, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
हेही वाचा… ताडोबातील निमढेला बफर क्षेत्रात.. “बबली” वाघिणीच्या बछड्यांचे “मान्सून मॅजिक”
शहरी भागात इंद्रमाता नगर येथे ४३ वर्षीय पुरुष, लष्करीबाग येथे ८ वर्षीय बालकाला हा आजार आढळला. ग्रामीणला वानाडोंगरी येथील एका ३६ वर्षीय पुरुष आणि कडवस येथील एका १६ वर्षीय महिलेला चिकनगुनिया असल्याचे पुढे आले.