लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : अमरावती, चिखलदरा, अकोला या जिल्ह्यांत १ ते ५ वयोगटातील बालकांचे मृत्यू वाढले आहेत. नागपूर- पुणे येथे मात्र हे मृत्यू कमी झाले आहेत. माहितीच्या अधिकारातून हे वास्तव समोर आले आहे.

अमरावतीत २०१९- २० मध्ये १ ते ५ वयोगटातील ७४ बालमृत्यू झाले. ही संख्या २०२०- २१ मध्ये १०८, २०२१- २२ मध्ये ८४ होती. परंतु २०२२- २३ मध्ये ही संख्या वाढून ९२ इतकी झाली.

आणखी वाचा-डेंग्यूने २३ वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ; सार्वजनिक व खासगी रुग्णालयांत डेंग्यू व टायफाईड रुग्णांची गर्दी

चिखलदरा या मागास भागात २०१९- २० मध्ये १५ मृत्यू, २०२०- २१ मध्ये ३२ मृत्यू, २०२१- २२ मध्ये १७ मृत्यू, २०२२- २३ मध्ये २० बालमृत्यू नोंदवले गेले. अकोलामध्ये २०१९- २० मध्ये ६६ मृत्यू, २०२०- २१ मध्ये ४५ मृत्यू, २०२१- २२ मध्ये ५३ मृत्यू, २०२२- २३ मध्ये ५४ बालमृत्यू नोंदवले गेले. यवतमाळमध्ये २०१९- २० मध्ये ३७ मृत्यू, २०२०- २१ मध्ये ४० मृत्यू, २०२१- २२ मध्ये २१ मृत्यू तर २०२२- २३ मध्ये २१ बालमृत्यू नोंदवले गेले. नागपुरात २०१९- २० मध्ये २८१ मृत्यू, २०२०- २१ मध्ये १६५ मृत्यू, २०२१- २२ मध्ये २१३ मृत्यू, २०२२- २३ मध्ये १३९ बालमृत्यू नोंदवले गेले. पुण्यात २०१९- २० मध्ये १४७ मृत्यू, २०२०- २१ मध्ये ११४ मृत्यू, २०२१- २२ मध्ये १२३ मृत्यू तर २०२२- २३ मध्ये ९३ बालमृत्यू नोंदवले गेले. या आकडेवारीला आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने नाव न टकण्याच्या अटीवर दुजोरा दिला. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती माहितीच्या अधिकारातून मिळवली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child death increased in amravati chikhaldara and akola mnb 82 mrj
Show comments