लोकसत्ता टीम

बुलढाणा: संतनगरी शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघालेल्या लोणार येथील निखाडे कुटुंबीयांच्या वाहनाला झालेल्या अपघातात जुळ्या मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला तर पत्नी, मुलगा, चालक गंभीर जखमी झाले. या अपघातात नागपूर येथील दोघे जण जखमी झाले आहे.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
seven killed 43 injured in kurla bus accident
कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय
container ran into food court, Khalapur,
खालापूर जवळ नियंत्रण सुटल्याने कंटेनर फुड कोर्टमध्ये घुसला; एकाचा मृत्यू, तीन वाहनांचे नुकसान

लोणार येथील गजानन निखाडे हे आपल्या परिवारासह (एमच ४६ डब्ल्यू ३८३३ क्रमांकाच्या) मारोती अल्टो कारने शेगाव येथे दर्शनासाठी जात होते. दरम्यान, घरून निघून जेमतेम अर्धा तास होत नाही तोच काळच त्यांना आडवा आला. मेहकर जालना रस्त्यावर चिंचोली बोरे फाट्याजवळ त्यांच्या वाहनाला नागपूर येथून येणाऱ्या (एमएच ४६ एन ४५३४) स्कॉर्पिओने धडक दिली. अपघातात अल्टोमधील आर्यन गजानन निखाडे(१० वर्षे) हा ठार झाला तर त्याची आई सविता गजानन निखाडे (३५), जुळा भाऊ अंश गजानन निखाडे (१० वर्षे), चालक अंकुश उद्धव अवचार (३१) व स्कॉर्पिओमधील सुयोग परसराम भुके, अक्षय डिगांबर रनगारी (रा. नागपूर) हे जखमी झाले आहेत.

जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपास मेहकरच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वसंत पवार करीत

Story img Loader