नागपूर : समृद्धी महामार्गाच्या नागपुरातील प्रवेशद्वारावर एका कंटेनरने ट्रॅक्टरला धडक दिली होती. त्यामुळे ट्रॅक्टर आणि चौकातील ग्रिलमध्ये चेपून बाप-लेक असे दोन मजूर गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी मुलाचा सोमवारी मृत्यू झाला असून वडील अत्यवस्थ आहे.दगावलेल्या मुलाचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते.कृष्णा यादव (३५) असे दगावलेल्या मुलाचे नाव आहे. तर आत्माराम यादव असे वडिलांचे नाव आहे.

दोघेही छत्तीसगड येथील रहिवासी असून रोजगारासाठी नागपुरात आले होते. त्यापैकी कृष्णा यादव याचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झाले असून त्याला दोन वर्षांची मुलगीही आहे. अपघातात अत्यवस्थ कृष्णा यादववर रविवारी तडका- फडकी एम्स रुग्णालयात एक शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. परंतु, सोमवारी त्याचा मृत्यू झाला. हात कापल्या गेलेल्या आत्माराम यांना मेडिकल रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु, त्यांची प्रकृतीही नाजूक असल्याची माहिती आहे.

Story img Loader