माझा जन्म एका पंजाबी कुटुंबात झाला. आयुष्य थोडे अपरंपरागत होते. तेव्हापासून मला भारत वेगळा वाटतो. माझे बालपण सत्याच्या अगदी जवळ आहे आणि मला माझ्या पुस्तकात बालपणाचे वातावरण तयार करायचे होते. आपले बालपण म्हणजे एका देशासारखे असते. त्यात आपण रमतो आणि शिकतो, असे प्रतिपादन अभिनेत्री आणि लेखिका दीप्ती नवल यांनी केले.
हेही वाचा- बुलढाणा: ‘भारत जोडो’ यात्रा २३ ला मध्यप्रदेशकडे प्रस्थान करणार
ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टिव्हल २०२२ चा समारोप रविवारी झाला. यावेळी त्या बोलत होत्या. दीप्ती नवल यांनी त्यांच्या ‘अ कंट्री कॉल्ड चाईल्डहूड’ या पुस्तकाबद्दल बोलताना त्यांच्या जीवनाचे तपशीलवार वर्णन केले. दरम्यान, स्तंभलेखक तुहिने सिन्हा, विलास काळे, राधाष्ण पिल्लई, कृष्णा धनदास, भूपेंद्र चौबे, वैभव पुरंदरे असे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विलास काळे लिखित ‘कम, सी द वर्ल्ड विथ मी’ या पुस्तकाच्या प्रकाशनाने झाली.
हेही वाचा- अर्धे सत्र संपूनही वसतिगृहातील प्रवेश रखडलेलेच; राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर
या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुभेच्छा संदेश पाठवला. विकास काळे यांनी कसे जगावे याचे उत्तम उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे. त्यांचे प्रवासवर्णन तरुणांना नक्कीच बाहेर पडून जग तेथील चालीरिती, लोक आणि खाद्यपदार्थ पाहण्यासाठी प्रेरित करेल, असे गडकरी म्हणाले.
लेखक राधाकृष्णन पिल्लई यांनी चाणक्य ॲड आर्ट ऑफ पॅरेटींग या पुस्तकाविषयी बोलताना चाणक्यनीतीमधील मुलांना हाताळण्याविषयी विविध तंत्राचा तपशीलवार उल्लेख केला. सोहळ्याचा समारोप गायक संजीव अभ्यंकर यांच्या शास्त्रीय गायनाने झाला.