लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : लहान मुलांमध्ये ‘ॲलर्जी’चे प्रमाण २५ टक्क्यांच्या जवळपास आहे. या मुलांच्या आजाराचे वेळीच निदान व्हावे म्हणून नागपुरातील मेडिकल रुग्णालयातील बालरोग विभागात सोमवारपासून ही चाचणी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मुलांमधील आजाराचे वेळीच निदान करून त्यांना भविष्यातील गंभीर आजारापासून वाचवता येईल.

नागपुरातील मेडिकल रुग्णालयाला ७५ वर्षे पूर्ण होणार आहे. त्यानिमित्त रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. राज गजभिये आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांच्या नेतृत्वात विविध नवीन नवीन उपचाराच्या सोयी केल्या जात आहेत. सोमवारीही येथे लहान मुलांच्या ‘ॲलर्जी’ तपासणीची सोय सुरू करण्यात आली. येथे ही तपासणी केवळ ३०० रुपयांत केली जाणार आहे. खासगीत या तपासणीसाठी साडेचार ते पाच हजारांचा खर्च येतो.

आणखी वाचा-कार पार्कींगचा वाद; पोलीस कर्मचाऱ्याच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

श्वसनरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, पूर्वी लहान मुलांमध्ये ‘ॲलर्जी’चे प्रमाण ५ टक्केच्या जवळपास होते. परंतु, हे प्रमाण आता जागतिक स्तरावरही २५ टक्क्यांच्या जवळपास गेले आहे. ‘ॲलर्जी’चे वेळीच निदान न झाल्यास पुढे मुलांना दमा आणि फुफ्फुसाचा गंभीर आजारही संभवतो. या मुलांना अद्ययावत सोय मिळावी म्हणून मेडिकलच्या बालरोग विभागात ही सोय झाली आहे. या तपासणीसाठी बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनीष तिवारी, सहयोगी प्राध्यापक डॉ. अभिषेक मधुरा यांचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे आता येथे ‘ॲलर्जी’, अस्थमा ‘ॲलर्जी’, रायनाटिस ॲटोपिक डर्माटायटिस ॲण्ड फुल ‘ॲलर्जी’’ आदींच्या चाचण्यांची सोय सुरू झाली आहे.

आणखी वाचा-महानिर्मितीकडे केवळ दोन ते आठ दिवसांचाच कोळसा साठा! वाॅशरिजकडे मात्र लक्षावधी टन पडून

उपराजधानीतील ‘ॲलर्जी’चे कारण

नागपूर शहरातच नाही तर गावखेड्यातही आता धुळीचे प्रमाण वाढले आहे. काही विशिष्ट प्रकारच्या ‘ॲलर्जी’मुळे तापही येतो. सतत सर्दी, खोकला होण्यासाठीही धूळ, माती, परागकण, वाहनांमधून निघणारी प्रदूषित हवाही कारणीभूत असते. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणीही सर्वसामान्यांना त्या सिमेंटचा त्रास होऊ शकतो. प्राण्यांचे केस, विष्ठा, घरातील धूळ, त्वचेवरचा संसर्ग, तंतुमय केस, सल्फा, अंडी, दूध, गहू, डाळ, डास चावणे, मधमाशीचा दंश, घरातील झुरळे ही ‘ॲलर्जी’र्ची महत्त्वाची कारणे आहेत. तर ॲटोपिक त्वचारोग, ॲलर्जिक नासिकाशोध, दमा आणि अन्न ‘ॲलर्जी’ ही काही उदाहरणे आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Childrens allergy examination in medical hospital nagpur mnb 82 mrj