नागपूर : भारतात सण, उत्सव कोणताही असो, बाजारात चलती असते ती चायनामेड वस्तुंची. मग ते दिवाळीतले फटाके असोत, वा आणखी काही. यंदाच्या दिवाळीत मात्र पाण्याने जळणाऱ्या या दिव्यांचीच अधिक चर्चा आहे. दिवाळीच्या पूर्वी जशी घराची साफसफाई केली जाते, तसेच दिवाळीत घराची सजावट देखील केली जाते. यात विजेच्या माळा आणि दिवे या दोन प्रमुख गोष्टी आहेत. पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करायची तर मातीच्या दिव्यांशिवाय पर्याय नाही. मात्र, हल्ली पारंपरिक दिवाळीसोबतच सजावट देखील तितकीच महत्त्वाची झाली आहे. अशावेळी घरात एसीसारख्या वस्तु असल्यामुळे दिवे लावता येत नाहीत.

हेही वाचा >>> एन् धनत्रयोदशीला सोन्याचे दर उच्चांकीवर… तरीही ग्राहकांच्या रांगा…

Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Shaina NC Arvind Sawant
Shaina NC : अरविंद सावंत यांची जीभ घसरली; अपशब्द वापरल्याने शायना एन. सी. संतापल्या, म्हणाल्या, “महिलेला…”
rohit patil replied to ajit pawar allegation
“आर. आर. पाटलांनी केसानं गळा कापला” म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले…
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fourth list of 7 candidates
Sharad Pawar NCP 4th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?

घरात दिवे तर लावायचेच आहेत आणि मग पर्याय काय, तर पाण्याने जळणारे दिवे. यावेळी दिव्यांचा हा नवा प्रकार बाजारात आला आहे. एक दिवा २० ते २५ रुपयांना मिळतो, ज्याला तेल लागत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यात पाणी टाकले तरी ते लागतात. यामध्ये एक सेन्सर वापरण्यात आला आहे जो पाण्याच्या संपर्कात येताच जळू लागतो. दिवाळीला सुरुवात झाली असताना बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. या खरेदीत हे अनोखे दिवे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. हा अप्रतिम दिवा जो कोणी पाहतो तो थक्क होतो.

हेही वाचा >>> Video : ताडोबातील वाघ म्हणतो, ‘बस आता..! मला तुमचा कंटाळा आलाय’

या दिव्यासाठी तुम्हाला तेल किंवा माचिसची गरज नाही. त्यात पाणी टाकताच ते जळू लागते. हा इलेक्ट्रॉनिक दिवा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. यावर्षी हे दिवे प्रथमच दिसून येत आहेत, त्यामुळे फार कमी लोकांना याची माहिती आहे. पण पाहणाऱ्या ग्राहकाला पहिल्यांदा विश्वास बसत नाही. जर तुम्ही स्वतः पाणी ओतले आणि दोन-तीन वेळा दिवा लावला तर तुमचा विश्वास बसेल. एका दिव्याची किंमत २० ते ३० रुपयापर्यंत आहे. पाणी टाकताच विद्युत प्रवाह येतो आणि दिवा पेटतो. तो पूर्णपणे सुरक्षित आहे. पाण्याने जळणारा हा दिवा यावेळी सर्वांच्याच सजावटीत भर घालणार असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. यामुळे मुले जळणार नाहीत किंवा आग लागणार नाहीत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा दिवा देखील सर्वोत्तम पर्याय आहे. एकदा पाणी टाकल्यानंतर दोन ते तीन तास तो जळतो, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पारंपरिक मातीचे दिवे तर लावले जातातच, पण सजावटीसाठी या दिव्यांचा उपयोग नक्कीच होतो.

Story img Loader